Best Beaches in Kokan

Best Beaches in Kokan महाराष्ट्राला ७२० किलोमीटर सागरी किनारपट्टी लाभली यामध्ये कोकण एक सुंदर ठिकाण आहे. स्वर्गालाही लाजवेल असे नैसर्गिक सौंदर्य कोकणाला लाभले आहे. तुम्ही देखील विकेंडचा प्लॅन कोकणात करत असाल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या.

Best Beaches in Kokan

आरेवारे बीच- रत्नागिरी (Best Beaches in Kokan)

आरेवारे बीच ला जाण्यासाठी आपणांस रत्नागिरी तसेच गणपतीपुळे येथूनही जाता येते, रत्नागिरी ते आरेवारे अंतर सुमारे २५ किमी आहे. गणपतीपुळेपासून आरेवारे बीच हे ८ किमी अंतरावर आहे, तुम्ही येथून लोकल बस किंवा रिक्षा ने आरेवारे बीच ला जाऊ शकता. तुम्ही ट्रेन ने प्रवास करत असल्यास रत्नागिरी स्टेशन वरून एस. टी. ने जाता येते. बीच ला जाण्याचा मार्ग व्यवस्थित असून हा प्रवास निसर्गरम्य आहे. रस्त्याच्या आजूबाजूस वसलेली सुंदर गावं डोळ्यात साठवत आपण ३०-४० मिनिटांत आपण बीच वर पोहोचतो.

एकदा तुम्ही आरेवारे बीचवर पोहोचल्यानंतर, तुम्ही समुद्रकिनाऱ्याच्या निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद घेऊ शकता, समुद्रात डुंबू शकता किंवा आराम करू शकता. हा समुद्रकिनारा स्वच्छ पाण्यासाठी ओळखला जातो आणि रत्नागिरीला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये हे एक लोकप्रिय ठिकाण आहे.

Best Beaches in Kokan

दिवेआगर बीच

दिवेआगर हे महराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक पर्यटनस्थळ आहे. दिवेआगर हे अलिबागच्या ७५ किमी दक्षिणेस तर मुंबई पासून १७५ किमी अंतरावर आहे. दिवेआगर बीच देखील एक सुंदर नयन रम्य ठिकाण आहे जे पर्यटकांना नेहमी आकर्षित करते. हे माणगाव पासून ४८ किमी अंतरावर असलेले सुंदर बीच मऊ वाळू साठी प्रसिद्ध आहे. येथे येण्यासाठी ऑटो रिक्षा तसेच बस सेवा उपलब्ध आहे.

Best Beaches in Kokan

वेळणेश्वर बीच

रम्य असा समुद्र किनारा आणि किनारी वसलेले भव्य शिवालय. कोकणातील शिवभक्तांचे तीर्थक्षेत्रच रत्नागिरी गुहागर मार्गे वेळणेश्वर हे अंतर साधारण २० किमी आहे. येथील वेळणेश्वर मंदिरामुळे या बीच ला हे नाव पडले असावे. हे मंदिर देखील खुप प्रसिद्ध आहे.नारळाच्या बागांनी संपन्न परिसर येथे पाहायला मिळतो.तसंच येथील समुद्र किनाऱ्यावर कोकणातील अनेक फळं व अनेक प्रकारचे सरबत यांची मेजवानी घेता येते.

या ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा ने पर्यटकांसाठी राहण्याची व्यवस्था केलेली आहे. पर्यटन केंद्रातून सकाळी समुद्राचे मनमोहक दृश्य पाहता येते.

Best Beaches in Kokan

केळशी बीच- दापोली

केळशी हे रत्नागिरीतील लहानसे गावं, अगदी गावपण जपलेलं, मातीचे रस्ते प्राचीन मंदिरे, निसर्ग यांचा चांगला संगम अगदी फॉरेन च्या बीच ला देखील लाजवेल असे नयनरम्य बीच या गावाला लाभले आहे. खेडे जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी केळशी हे उत्तम ठिकाण आहे या गावाला २.५ किमी चा समुद्र किनारा लाभला आहे. धार्मिक महत्व आणि दीर्घ इतिहास असलेली मंदिरे येथे आहेत. येथे जाण्यासाठी रत्नागिरी पर्यंत ट्रेन आणि त्यानंतर रिक्षा अथवा एस.टी. ने राजापूर पासून धारतळे आणि आडीवरे अशी जाण्याची व्यवस्था आहे. बीच अतिशय सुंदर असून येथे अनेक मांदिरे आहेत जी पेशवेकालीन आहेत त्यापैकी प्रसिद्ध असे केळशीचे महालक्ष्मी मंदिर आहे. जे केळशीपासून ३ किमी अंतरावर आहे. येथे राहण्यासाठी हॉटेल्स तसेच कॉटेज उपलब्ध आहेत.

श्रीवर्धन – हरिहरेश्वर

रायगड तालुक्यात हरिहरेश्वर (प्राचीन शिवमंदिरा शेजारी) पसरलेला विस्तीर्ण असा मनमोहक समुद्र किनारा निळ्याशार पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील शिवमंदिर देखील खुप प्रसिद्ध आहे सागरी किनारपट्टीवर वसलेले हे सुंदर गावं नेहमी पर्यटकांनी गजबजलेले असते.

Best Beaches in Kokan

श्रीवर्धनचा समुद्रकिनारा प्रेक्षणीय आहेच पण येथून जवळच असलेले कोंडवली, दिवेआगर येथील समुद्रकिनारेही अतिशय सुंदर आहेत. गावांत पेशव्यांचे लक्ष्मीनारायणाचे देऊळ आहे. मंदिरातील मूर्ती प्राचीन आहे. येथे नारळी, पोफळीची बने, आंबा, फणसांची झाडे आहेत. गांव छोटे असल्याने मोजकीच हॉटेल्स आहेत पण अनेक घरातून निवासाची तसेच भोजनाची सोय होऊ शकते.

श्रीवर्धनपासून १४-१५ किमीवर असलेले हरिहरेश्वर ही दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. चारीबाजूंनी टेकड्यांनी वेढलेले हे सुंदर ठिकाण देवघर म्हणजे हाऊस ऑफ गॉड म्हणूनही ओळखले जाते. येथेच सावित्री नदी समुद्राला मिळते. हरिहरेश्वराचे भव्य मंदिर आणि दोन आकर्षक समुद्र किनारेही येथील मुख्य आकर्षण आहेत. हे मंदिर १६ व्या शतकातले असून आत ब्रह्मा, विष्णू, महेश तसेच पार्वतीचीही मूर्ती आहे. आवारात काळभैरवाचे मंदिर आहे. 

श्रीवर्धन मुंबई पासून साधारणतः १८० किमी अंतर आहे कार किंवा बस ने जायचे असल्यास ४-५ तासात आपण येथे पोहोचतो. ट्रेन ने येथे जाण्यासाठी जवळेचे रेल्वेस्टेशन माणगाव आहे. माणगाव वरून एस.टी. किंवा रिक्षा ने जाता येते. तसेच फेरी द्वारे मुंबई ते मांडवा १ तास व पुढे टॅक्सी किंवा बस ने ४ तासाचं प्रवास करून श्रीवर्धन ला पोहोचता येते.

रेंज रोव्हर सारखे दमदार फीचर्स आता टाटा हॅरियर मध्ये

Best Palak Paneer Recipe in few minutes

Best Rice Flour Ghavan Recipes in Marathi

Maharashtra Tourism

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Lavasa city बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? Saurabh Netravalkar पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणारा भारतीय वंशाचा क्रिकेटर. Tejashree Pradhan हिचा सिनेसृष्टीतील प्रवास World Environment Day: A Call to Action Who is Kavya Maran?