Honda Hness cb350 : भारत हा जगातील दुचाकीची सर्वात मोठे बाजारपेठ आहे. आणि भारतामध्ये अनेक दुचाकी कंपन्या आपल्या वेगवेगळ्या सेगमेंट मधील दुचाकी येथे विक्री करतात. भारतीय दुचाकी बाजारात रॉयल एनफिल्ड, होंडा, टीव्हीएस, बजाज, केटीएम, एझडी, यामाहा, ओला इत्यादी अनेक कंपन्या आपल्या दुचाकी विक्री आणि सेवा पुरवतात. अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक दुचाकी देखील भारतात लॉन्च करण्यात आल्या आहेत. रॉयल एनफिल्ड प्रमाणे जपानी कंपनी Honda देखील भारतीय बाजारात कित्येक वर्षापासून विक्री आणि सेवा देत आहे. Honda कंपनीच्या दुचाकी या त्यांच्या दमदार इंजिन साठी ओळखल्या जातात. या सर्वच कंपन्या वेगवेगळ्या सेगमेंट मधल्या तोडीस तोड देणाऱ्या दुचाकी लॉन्च करून एकमेकांना तगडी टक्कर देत आहेत. सदर लेखांमध्ये आपण Honda Hness cb350 या दमदार दुचाकी विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
Honda ने भारतीय बाजारपेठेत Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी क्लासिक, रेट्रो लूक असलेली Honda Hness cb350 आणि Honda cb350 RS या दोन दमदार बाईक लॉन्च करून रॉयल एनफिल्ड ला तगडे आव्हान दिले आहे.
Honda Hness cb350 ही एक आधुनिक क्रुझर बाईक आहे जी लॉंग ड्राईव्ह किंवा टुरिंग करणाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून भारतीय बाजारपेठेत Honda ने ही बाईक लॉन्च केली आहे, या बाईकमध्ये आधुनिक आणि रेट्रो असे डिझाईन,१६६ एम एम ग्राउंड क्लिअरन्स आणि युनिक क्लासिक डिझाईन यांचे संमिश्र मिश्रण बघायला मिळते. तसेच सुरक्षेसाठी ड्युअल चॅनल एबीएस ऑफर करण्यात आला आहे. ट्यूबलेस टायर, अलॉय व्हील आणि आधुनिक टेक्नॉलॉजी सह पावरफुल इंजिनमुळे भारतीय बाजारपेठेत या बाईकने वेगळी ओळख निर्माण केली आहे.
बजाज ने लॉन्च केली जगातील पहिली सीएनजी बाईक
Honda Hness cb350 – डिझाइन
भारतीय बाजारपेठेत क्लासिक लूक असलेल्या बाईक रॉयल एनफिल्ड या कंपनीच्या क्लासिक ३५०, बुलेट ३५० यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी होंडाने या बाईक मध्ये क्लासिक लूक वर बरीच मेहनत घेतलेली दिसते या बाईकची मोठी गोल हेडलाईट, मस्कुलर मडगार्ड त्यावर असलेली क्रोम फिनिश मस्कुलर टॅंक त्यावर असलेला होंडा चा लोगो हे सगळे कंपोनंट गाडीला एक भारदस्त क्लासिक लुक देतात. या बाईची सीट देखील आरामदायी असून टुरिंग साठी योग्य आहे.
Honda Hness cb350 – इंजिन
होंडा Hness CB350 मध्ये ३४८ सीसी,४ स्ट्रोक सिंगल-सिलेंडर, एयर-कूल्ड इंजिन ऑफर करते जे २१.७ बीएचपी @५५०० आरपीएम पॉवर आणि ३० एनएम @३००० आरपीएम टॉर्क जनरेट करते. हे पॉवरफुल इंजिन एका मजेदार राइडचा अनुभव देते. यामध्ये असलेल्या फ्युएल इंजेक्शन सिस्टीममुळे याची इंधन कार्यक्षमता वाढून हे इंजिन सरासरी ३५ केएमपीएलचा दमदार मायलेज देते. इंजिन अतिशय रिफाइंड असून एकदम स्मूथ आहे. Hness CB350 ला १५ लिटर क्षमतेचा फ्युल टॅंक देण्यात आला आहे, जो ५२५ ते ५५० किलोमीटर ची रायडिंग रेंज प्रदान करतो.
अत्याधुनिक फीचर्स
Hness CB350 मध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स ऑफर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये डिजिटल / अनलॉग मीटर कंसोल, गिअर पोझिशन इंडिकेटर, ओडोमीटर, फ्युल इंडिकेटर, ट्रिप मीटर, रियल-टाइम मायलेज ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न बाय टर्न नेवीगेशन इत्यादी.
तसेच सुरक्षेसाठी ड्युअल चॅनल एबीएस ऑफर करण्यात आला आहे. ट्यूबलेस टायर, अलॉय व्हील,
व्हेरियंट्स आणि किंमत
होंडा Hness CB 350 चे कंपनीने दोन व्हेरिएंट भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत यामध्ये DLX आणि DLX Pro या व्यतिरिक्त होंडा ने DLX Pro chrome, Legacy Edition यांच्या किमती पुढील प्रमाणे
व्हेरियंट | किंमत |
---|---|
DLX | Rs. 2.54 Lakh* |
DLX Pro | Rs. 2.57 Lakh* |
DLX Pro chrome | Rs. 2.60 Lakh* |
Legacy Edition | Rs. 2.61 Lakh* |
कलर पर्याय
वरील वेरियंट्स मध्ये आपणास अनेक कलर पर्याय मिळतात त्यात प्रामुख्याने पर्ल नाईटस्टार ब्लॅक, प्रेशियस मेटलिक रेड, ब्ल्यू, ग्रीन इत्यादी कलर पर्याय उपलब्ध आहेत.
भारतीय बाजारातील सर्वात लोकप्रिय कार जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Honda official website Click here
असेच नवनवीन ऑटो अपडेट मिळवण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा तसेच सदर लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.