Guntur Kaaram : मागील अनेक आठवडे बॉक्स ऑफिस वर साउथ सिनेमांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हनुमान, गुंटूर करम इ. त्रिविक्रम श्रीनिवास दिग्दर्शित Guntur Kaaram हा सिनेमा अवघ्या २०० कोटी मध्ये बनवला आहे आणि या सिनेमाने आतापर्यंत खूप चांगली कमाई केली आहे. सुरुवातीच्या सात दिवसातच त्यांनी १०७.९ कोटीची कमाई केली होती. सध्या सिनेमातील कलाकार आणि त्यांनी घेतलेले मानधन यांचीच चर्चा होताना दिसत आहे. मुख्य भूमिकेत यामध्ये महेश बाबू, मीनाक्षी, श्री लीला, ब्रह्मानंदम इत्यादी फेमस चेहरे महत्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत. सिनेमाची चर्चा ही साऊथ सुपरस्टार महेश बाबू यांनी ७८ कोटी रुपयांचे मानधन घेतले यामुळे देखील होत आहे. साउथ फिल्म इंडस्ट्रीतील महागडा चेहरा म्हणून महेश बाबूकडे पाहिले जाते. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता गुंटूर करम पुन्हा ओटीटी गाजवण्यास सज्ज झाला आहे. महेश बाबू चा २०२४ मधील नविन चित्रपट गुंटूर करम हा १२ जानेवारी ला संक्रातीच्या दरम्यान चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हनुमान, सैंधव, ना सामी रंगा, कॅप्टन मिलर आणि अय्यलान पुढील सगळे चित्रपट तुम्ही आता OTT वर देखील लवकरात लवकर पाहू शकता जाणून घ्या कधी? आणि कुठे ?
फेब्रुवारी महिन्यातील व्हॅलेंटाईन आठवड्याच्या अगोदर म्हणजेच ९ फेब्रुवारीला हा चित्रपट हिंदी, कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलगू भाषांमध्ये रिलीज होणार आहे. OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स ने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून माहिती देताना लिहिले की “चीजे बहुत गर्म होने वाली है, क्योंकि रावडी रामाना आ रहा है |” गुंटूर करम ९ फेब्रुवारीला अनेक भाषांमध्ये नेटफ्लिक्स वर आला आहे.
Guntur Kaaram बॉक्स ऑफिस कलेक्शन
Guntur Kaaram ला बॉक्स ऑफिसवर लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे, अनेक चित्रपट एकाच आठवड्यात प्रदर्शित होऊनही लोकांनी गुंटूर करमला चांगला प्रतिसाद दिला. एका सर्वेनुसार संपूर्ण भारत भरात २३ दिवसात जवळपास १२४.८२ कोटींची कमाई केली. तसेच जगभरातील कलेक्शन सुमारे १७७.६७ कोटी होते.
Guntur Kaaram त्रिविक्रम श्रीनिवास आणि महेश बाबू यांचा एकत्रित असा तिसरा चित्रपट होता. अगोदर या जोडीने अथडू (२००५), खलेजा (२०१०) असे दोन ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.
Guntur Kaaram पटकथा
हा चित्रपट मनोरंजन करणारा तसेच एक कौटुंबिक ड्रामा आहे, यातील दम मसाला हे गाणं छान आहे, या चित्रपटाची कथा गुंटुर मधील रामाना – महेश बाबू भोवती फिरताना दिसते, रामाना चे त्याच्या आईसोबत चांगले संबंध नसतात, जी लवकरच राजकारणी बनणार असते. तेव्हा रामाना चे आजोबा – प्रकाश राज रामानाला त्याच्या आईशी सर्व संबंध तोडायला सांगतात, आणि रामाना २५ वर्षांपूर्वी आईला का सोडून गेला त्याचे सत्य शोधण्यासाठी निघतो.
Guntur Kaaram हा चित्रपट १५९ मिनिटांचा चित्रपटगृहात रिलीज झाला होता, आता अशी चर्चा आहे की ओटीटीवर टाईम वाढवला जाऊ शकतो. थिऐटर वर्जन मधून चित्रपटातील अम्मा या गाण्याला अगोदरच कात्री लावण्यात आली होती, इतर काही दृश्य देखील हटवली गेली होती. तसेच हटवलेले दृश्य आणि गाणं आता OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स वर पाहायला मिळणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचे अम्मा हे गाणे अगोदरच युट्युबवर प्रदर्शित केले आहे.
3 Easy Way to Earn Money Online