Bigg Boss Marathi Season 5

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठी सीजन ५ मध्ये रोज नव्यानव्या गोष्टी घडताना आपणास दिसत आहेत. अशातच काही वादग्रस्त कंटेस्टंट आपला मनमानी कारभार किती ओरडा पडला तरीही चालूच ठेवत आहेत. अशाच सुरज चव्हाण हा खेड्यातून आलेला रील स्टार खूप चांगला खेळत असून, महाराष्ट्रातील जनतेचे प्रेम देखील त्याला भरभरून मिळत आहे.

Bigg Boss Marathi Season 5
Bigg Boss Marathi Season 5

Bigg Boss Marathi Season 5

बिग बॉस मराठी सीजन ५ होस्ट करण्याची जबाबदारी रितेश देशमुख यांच्यावर असून चुकणाऱ्या कॉन्टेस्टंटचा ते चांगलाच पान उतारा करताना दिसत आहेत.

कधी कधी खेळ इतका विकोपला जातो की कंटेस्टंट अगदी पर्सनल लेवलला कमेंट करतात, यामुळे समोरचा कंटेस्टंट दुखावला देखील जातो. सीजन 5 मधली वादग्रस्त कंटेस्टंट निक्की तांबोळी ने वर्षा उसगावकर यांच्यावर पर्सनल कमेंट केली. त्यामुळे रितेश देशमुख यांच्याकडून तिला चांगलीच शाब्दिक फटकार मिळाली. यानंतर निक्कीने माफी मागितली. या अगोदर देखील Nikki Tamboli ने अनेकदा भाषेच्या मर्यादा तोडत खालच्या थराला जात टिप्पणी केल्या.

Bigg Boss Marathi Season 5
Bigg Boss Marathi Season 5

Bigg Boss Marathi Season 5 -काय म्हणाली निक्की

Bigg Boss Marathi Season 5 सुरू झाल्यापासून निक्की तांबोळीचा मनमानी कारभार चालू आहे, मागील एका टास्क दरम्यान मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या होत्या, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली होती. या प्रकारानंतर देखील तिचे येरे माझ्या मागल्या हे चालूच आहे. अलीकडे एका टास्क दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यावर निक्की तांबोळीने पर्सनल लेवलला जात त्यांच्या मातृत्वावर भाष्य केले. ती म्हणाली की “वर्षा मदरहूड को नही समजेगी क्योंकि उन्होंने किसी बच्चे को जन्म नही दिया है| कैसे मां का प्यार महसूस करेंगी|

या सगळ्या प्रकारानंतर रितेश देशमुख यांनी निक्की ला चांगले सुनावले, तसेच निक्कीने देखील या झाल्या प्रकाराबद्दल वर्षा उसगावकर यांची माफी मागितली आणि वर्षा उसगावकर यांनी देखील मोठ्या मनाने निक्की ला माफ केले.

अभिजीत केळकर हे देखील नक्की वर भडकले यांनी पोस्ट करत आपले मत मांडले ” एखाद्या बाईच्या मातृत्वावर बोलताना ती कधी आई झाली आहे की नाही, आणि ते आपल्याला माहित आहे की नाही हे कसं मॅटर करत? मुळात दुसऱ्याच्या इतक्या खाजगी आणि संवेदनशील विषयावर बोलणाऱ्या माणसाचं मानसिक आरोग्य पुन्हा एकदा तपासायला हवं…पण वर्षाताई तुमच्या संयमाला सलाम.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Vinesh Phogat ने जाहीर केली निवृत्ती Golden boy ने रौप्य पदक जिंकत रचला इतिहास Neeraj Chopra Won Silver Medal मराठमोळ्या Avinash Sable ने रचला इतिहास पण मेडल हुकले. Mumbai’s most famous street food Famous places for Monsoon Trip in India