Bajaj Qute Marathi Info

Bajaj Qute Marathi Info : बजाज क्युट (Bajaj Qute) ही एक लोकप्रिय प्रवासी चार चाकी ऑटो आहे. जी खास शहरातील वर्दळीच्या प्रवासी वापरासाठी डिझाइन करण्यात आली आहे. कमी किंमतीत, उत्कृष्ट मायलेज आणि आकर्षक डिझाइनसाठी प्रसिद्ध असलेली, बजाज क्युट लोकांना एक चांगला पर्याय प्रदान करते. चला तर मग बजाज क्युटची किंमत, इंजिन, मायलेज आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती घेऊया.

Table of Contents

बजाज क्युटच्या किंमतीचा आढावा घेतल्यास, Bajaj Qute भारतीय बाजारात अतिशय किफायतशीर किमतीत उपलब्ध असून, तिची किंमत सुमारे ₹ ३ लाख ६१ हजार (एक्स-शोरूम) तर सीएनजी वर्जन आणि पेट्रोल वर्जन यांच्या किमती विविध राज्यानुसार बदलू शकतात, जी प्रामुख्याने मध्यमवर्गीय आणि ग्रामीण भागातील ऑटो धारकांना आकर्षित करण्याकरिता किफायतशीर किमतीत लॉन्च केली आहे.

Bajaj Qute Marathi Info
Bajaj Qute Marathi Info

Bajaj Qute Marathi Info

इंजिन (Engine) बजाज क्युटमध्ये २-सिलिंडर, २१६ सीसी पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या इंजिनाची पॉवर १६.१ बीएचपी (हर्सपॉवर) आणि टॉर्क १०.८३ न्यूटन मीटर आहे. यामुळे बजाज क्युट शहरात सहज आणि आरामदायक राईड देते. या इंजिनाची खासियत म्हणजे ती अतिशय इको-फ्रेंडली आहे, कारण त्याचे उत्सर्जन खूप कमी आहे. या २१६ सीसीच्या बजाज क्युटमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स आहे, जो वापरण्यासाठी सुलभ आहे आणि वाहनाला चांगला वेग मिळवून देतो.

मायलेज (Mileage) बजाज क्युटचा मायलेज ३५ ते ४० किलोमीटर प्रति लिटर असून. शहरातील द्रुतगतीमध्ये व पार्किंगच्या अडचणी टाळण्यासाठी तसेच इंधन खर्चावर बचत करण्यासाठी बजाज क्युट एक चांगला पर्याय आहे. तुम्हाला एक किफायती आणि कमी इंधन खर्चाचे वाहन हवे असेल, तर बजाज क्युट तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

Bajaj Qute Marathi Info
Bajaj Qute Marathi Info

फ्यूल टाइप (Fuel Type) बजाज क्युट पेट्रोल इंजिनसह CNG पर्यायही उपलब्ध आहे, यामध्ये ३५ लीटर सीएनजी टॅंक ज्यामुळे इंधन खर्च आणखी कमी होतो.

डिझाइन आणि आकार (Design and Dimensions) बजाज क्युटचा आकार छोटा आणि आकर्षक आहे, ज्यामुळे बजाज क्युट शहरी भागात किंवा गजबजलेल्या ठिकाणी सुलभपणे फिरवता येते. याचे लांबी २.७७ मीटर, रुंदी १.३५ मीटर आणि उंची १.६७ मीटर आहे. क्युटच्या आकारामुळे, ती कमी जागेत पार्किंगसाठी योग्य आहे, आणि क्युटच्या लहान आकारामुळे आपल्याला वाहतूक कोंड्यापासून सुटका मिळवता येते. याचे २+२ सीटर डिझाइन, म्हणजेच दोन पुढील सीट्स आणि दोन मागील सीट्स, या वाहनाला अत्यंत उपयोगी बनवते. त्यामुळे, छोटे कुटुंब किंवा दोन व्यक्तींसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

सुरक्षा (Safety) बजाज क्युटमध्ये सुरक्षेसाठी बेसिक सुविधांचा समावेश आहे. यात ड्रायव्हर आणि सहायकासाठी सीट बेल्ट आणि समोर साइड इन्क्लोजर सिस्टीम आहे, जी किरकोळ अपघातांमध्ये सुरक्षितता प्रदान करते. त्यात इतर वाहनांप्रमाणे उत्तम सुरक्षा फीचर्स नाहीत. पण त्याच्या सिटी यूझर प्रोफाइलसाठी ते पुरेसे आहेत.

हे देखील वाचा – Ather Rizta info in Marathi

Bajaj Qute Marathi Info
Bajaj Qute Marathi Info

वैशिष्टे Features) बजाज क्युटमध्ये काही सोयीच्या वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे. यात चाइल्ड सेफ्टी लॉक, स्टाइलिश हेडलाइट्स, आणि एक एअर बॅग. तथापि, अन्य उच्च श्रेणीच्या वाहनांच्या तुलनेत अधिक एडवांस फीचर्स नाहीत, पण किफायतशीर आणि कमीत कमी खर्चात परिवहन प्रदान करणारे आहे.

Bajaj Qute Marathi Review | Bajaj Qute Marathi Info | Bajaj Qute Marathi Info | Bajaj Qute Marathi Info

तुम्ही जर एका शहरात फिरण्यासाठी अथवा प्रवासी ने आण करण्यासाठी कमी इंधन खर्च आणि परवडणारे वाहन शोधत असाल, तर बजाज क्युट हा एक उत्तम पर्याय आहे. कमी किंमत आणि चांगला मायलेज आणि आकर्षक डिझाइन या सर्व गोष्टी बजाज क्युट ला एक चांगला पर्याय बनवतात.

Bajaj Qute Marathi Info बजाज क्युट हे ग्रामीण भागात प्रवासी ने आण करण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरतो, ३ चाकी ऑटो रिक्षाला रिप्लेस करण्यासाठी आणि एक सुरक्षित पर्याय म्हणून बजाज क्युट हि लॉन्च करण्यात आली आहे.

Bajaj Qute च्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Vinesh Phogat ने जाहीर केली निवृत्ती Golden boy ने रौप्य पदक जिंकत रचला इतिहास Neeraj Chopra Won Silver Medal मराठमोळ्या Avinash Sable ने रचला इतिहास पण मेडल हुकले. Mumbai’s most famous street food Famous places for Monsoon Trip in India