Bajaj Pulsar N250 info in Marathi

Bajaj Pulsar N250 info in marathi: बजाजच्या पल्सर सिरीज ने एक दशकाहून अधिक तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. पल्सर सिरीज मध्ये बजाज ऑटोने Bajaj Pulsar 200, Bajaj Pulsar NS 200, Bajaj Pulsar N 160, Bajaj Pulsar NS 125, Bajaj Pulsar 160, Bajaj Pulsar 125, Bajaj Pulsar 150 असे अनेक व्हेरिएंट्स मागील दशकात लॉन्च केले. जे भारतात खूप प्रसिद्ध झाले. बजाज ऑटोने 250 cc Pulsar मध्ये आधुनिक बदल करून Pulsar 150, Pulsar 200 ची सक्सेसर म्हणून लॉन्च केलेली दमदार बाईक Bajaj Pulsar N250 बद्दल संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

Bajaj Pulsar N250 info in Marathi
Bajaj Pulsar N250 info in Marathi

बजाज ऑटो ने Bajaj Pulsar N250 १,५१,००० रु. (एक्स शोरूम) किमतीमध्ये लॉन्च केली आहे. बजाज ऑटोच्या बाईक्स या किंमत आणि मेंटेनन्स च्या दृष्टीने परवडणाऱ्या असून लोक देखील या बाईक्सना भरभरून प्रतिसाद देत आहेत. Pulsar N250 बजाज ऑटोची पावरफुल बाईक आहे. कंपनीने या बाईकच्या डिझाईन लाईन मध्ये तसेच हार्डवेअर मध्ये बदल करून आधुनिक स्पोर्टी लूक असणारी दमदार बाईक लॉन्च केली आहे. यामध्ये अनेक आधुनिक फीचर्स जसे एलईडी प्रोजेक्टर हेड लॅम्प, एलईडी डी.आर.एल., यूएसबी चार्जिंग पोर्ट, ट्रॅक्शन कंट्रोल, एबीएस, मल्टिपल रायटिग मोड, अप साईड डाऊन फोर्क्स, असे अनेक फीचर्स ऑफर करण्यात आले आहेत.

बजाज ने लॉन्च केली NS ची सक्सेसर NS 400z जाणून घ्या किंमत आणि सगळे अपडेट

Bajaj Pulsar N250 info in marathi हायलाइट्स

इंजिन २९४ सी सी
मायलेज (ARAI)३५-४४ Kmpl
ट्रान्समिशन५ स्पीड
कर्ब वेट१६४ किलो
फ्युलटँक१४ लिटर
Bajaj Pulsar N250 info in marathi
Bajaj Pulsar N250 info in marathi

Bajaj Pulsar N250 किंमत

  • Pulsar N250 Dual channel ABS – १,५१,००० रु. (एक्स शोरूम)

Bajaj Pulsar N250 इंजिन

Bajaj Pulsar N250 मध्ये 249.07 सीसी सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक 2 व्हॉल्व, ऑइल कुल्ड, FI इंजिन मिळते, 5 स्पीड ट्रान्समिशनसह, हे इंजिन 24.1 एचपी पॉवर तसेच 21.5 एन एम टॉर्क जनरेट करते.

कलर्स पर्याय

  • Brooklyn Blacks
  • Glossy Racing Red
  • Pearl Metalic White

Upcoming Bajaj Pulsar NS 400 info in marathi

व्हेरिएंट्स

फीचर्स

Bajaj Pulsar N250 मध्ये सुरक्षेच्या दृष्टीने ड्युअल चॅनल स्वीचेबल एबीएस, ड्युअल डिस्क, ट्रॅक्शन कंट्रोल, अप साईड डाऊन सस्पेन्शन सह अपग्रेडेड नवीन स्पोर्टी डिझाईन आणि कलर थीम देण्यात आली आहे. एल इ डी आर एल, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, नेव्हिगेशन असिस्ट, डिजिटल ऑडो मिटर, ट्यूबलेस टायर, सर्विस रिमाइंडर ब्लूटूथ, कनेक्टिव्हिटी यासारखे अत्याधुनिक फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत.

Bajaj Pulsar N250 स्पर्धा

Pulsar N250 ची स्पर्धा ही थेट Suzuki Gixxer 250, KTM Duke 250, TVs Apache RTR 200 4V यांच्या सोबत असेल.

मित्रांनो तुम्ही देखील 1 ते 2 लाखांपर्यंत स्पोर्टी दमदार लुक असलेल्या बाईक च्या शोधात असाल तर Bajaj Pulsar N250 हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

Official Site Bajaj Auto

असेच नवनवीन ऑटो अपडेट जाणून घेण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा तसेच Bajaj Pulsar N250 info in marathi लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.

हे देखील वाचा.

Xiaomi SU 7 ev info in Marathi जाणून घ्या सगळे अपडेट.

ferrari ने लॉन्च केली एसयुव्ही वाचा संपूर्ण माहिती.

2 thoughts on “Bajaj Pulsar N250 info in Marathi”

  1. Pingback: Bajaj Pulsar NS 400z बजाज ने लॉन्च केली NS ची सक्सेसर बाईक जाणून घ्या किंमत आणि सगळे अपडेट

  2. Pingback: Bajaj freedom 125 cng info in Marathi बजाज ने लॉन्च केली जगातील पहिली सीएनजी बाईक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Vinesh Phogat ने जाहीर केली निवृत्ती Golden boy ने रौप्य पदक जिंकत रचला इतिहास Neeraj Chopra Won Silver Medal मराठमोळ्या Avinash Sable ने रचला इतिहास पण मेडल हुकले. Mumbai’s most famous street food Famous places for Monsoon Trip in India