Aluche Fatfate ׀ Aluchi Patal Bhaji Recipe : कोकण हा जैवविविधतेने नटलेला संपन्न परिसर आहे, या परिसराचा मोठा भाग हा जंगलांनी व्यापलेला असून येथील परिसर समुद्र, डोंगर, नद्या, यांच्या सौंदर्याने नटलेला आहे. या जंगलामध्ये अनेक वनौषधी आढळून येतात. वेगवेगळ्या मोसमांमध्ये वेगवेगळ्या भाज्या उगवतात. येथील लोकांसाठी निसर्ग हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. या निसर्गाच्या कुशीतून मिळणारा एक अनमोल खजिना म्हणजे कोकणी रानभाज्या. शिवाय या भाज्यांसाठी कोणत्याही प्रकारची लागवड, खते, कीटकनाशके यांची गरज नसते, या भाज्या निसर्गात नैसर्गिक रित्या वाढतात या भाज्यांना अनोखी चव असून त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात. कोकणात निसर्गाच्या रूपांमध्ये जशी विविध आढळून येते तशीच विविधता येथील वनस्पतीमध्ये देखील आढळून येते. कोकणात विविध प्रकारच्या रानभाज्या वेगवेगळ्या हंगामात आढळतात. यात प्रामुख्याने अळू/तेरा, टाकळा, कुर्डू, सुरण, काटळ /करटोली इत्यादी रानभाज्यांचा समावेश होतो. या भाज्या जंगलात आणि डोंगरात वाढतात आणि त्यांच्या वाढीसाठी विशेष प्रकारच्या माती व वातावरणाची गरज असते, ज्यामुळे त्यांना अनोखी चव आणि गुणधर्म प्राप्त होतात.
सदर लेखांमध्ये आज आपण Aluche Fatfate, Aluchi Patal Bhaji रेसिपी पाहणार आहोत, जी चवीला अतिशय चविष्ट असून पावसाळ्याच्या सीजन मध्ये प्रत्येकाने खावी अशी चवदार अळूची भाजी.
Aluche Fatfate ׀ Aluchi Patal Bhaji Recipe- साहित्य
अळूची छोटी पाने (दांड्यासह) – १२ ते १४
गोडा मसाला ३/४ टेबल स्पून
भिजवलेली चना डाळ – १ टेबल स्पून
शेंगदाणे – २ टेबल स्पून
शेंगदाणा तेल – २ टेबल स्पून
मिरची पावडर – ३/४ टेबल स्पून / हिरवी मिरची
हळद – १/२ टेबल स्पून
हिंग – १/४ टेबल स्पून
जिरे – १ टेबल स्पून
चिंचेचे पाणी – १ टेबल स्पून
गूळ पावडर – १/२ टीस्पून
चवीनुसार मीठ
अळूच्या पानांना खाज असते. त्यामुळे हाताला थोडे तेल लावून नंतर पाने आणि देठ चिरून घ्या.
साखरोळी एक पारंपरिक पदार्थ याची झटपट तयार होणारी रेसिपी
Aluche Fatfate ׀ Aluchi Patal Bhaji Recipe -पाककृती
१. सर्वप्रथम अळूची पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत.
२. शेंगदाणे आणि चणाडाळ १५ ते २० मिनिटे भिजत ठेवा.
३. स्वच्छ धुतलेली अळूची पाने घेऊन त्याचे देठ पानापासून वेगळे करून घ्या.
४. अळूच्या पानांवरील आणि देठांवरील पातळ साल सुरी अथवा चाकूच्या सहाय्याने काढून घ्या, व देठांचे लहान लहान तुकडे करा आणि अळूची पाने बारीक चिरून घ्या.
५. चिरलेला अळू व लहान लहान देठ आणि भिजवलेले चणाडाळ व शेंगदाणे हे वेगवेगळ्या भांड्यांमध्ये शिजवून घ्या/ अथवा कुकरला दोन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या.
६. शिकल्यानंतर अळू आणि त्याचे देठ चांगले स्मॅश करून घ्या. त्यामध्ये चिंचेचे पाणी आणि गूळ पावडर घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. चिंचेच्या पाण्याऐवजी तुम्ही कोकम देखील वापरू शकता.
७. चणाडाळ आणि शेंगदाणे घालून मिक्स करा.
८. गोडा मसाला, मीठ घालून परतावे. गोडा मसाल्याऐवजी तुम्ही गरम मसाला घालू शकता.
९. कढईत तेल गरम करा.
१०. मोहरी घाला आणि गरम झाल्यानंतर त्यात हिंग, मेथी आणि हिरवी मिरची टाका आणि त्यात अळूचे मिश्रण घाला.
११. साधारण ८-१० मिनिटे मध्यम आचेवर शिजवा.
अतिशय रुचकर अशी Aluche Fatfate ׀ Aluchi Patal Bhaji Recipe अळूचे फतफते / अळूची पातळ भाजी तय्यार ही भाजी तुम्ही भात ,भाकरी सोबत सर्व्ह करू शकता. कोकण आणि तळ कोकणामध्ये हा प्रकार फार प्रसिद्ध आहे. कोकणी बांधव पावसाळ्यात हमखास या अळुच्या भाजीमध्ये फणसाच्या बिया, चणे इत्यादी भाजीमध्ये टाकून ही भाजी बनवतात.
कोकणातील विविध प्रकारच्या रानभाज्या
Aluche Fatfate ׀ Aluchi Patal Bhaji Recipe
कोकणातील अशाच दर्जेदार आणि चविष्ट रेसिपींचे अपडेट मिळवण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा, तसेच सदर लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.
हे देखील वाचा
Pingback: करटोलीच्या भाजीच्या आरोग्यदायी गुणधर्म Spiny Gourd benefits in Marathi