100+ DIWALI Shubhechha in Marathi

DIWALI Shubhechha in Marathi

DIWALI Shubhechha in Marathi : शुभ दीपावली, दिवाळी हा भारतातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण आहे, जो संपूर्ण भारतात आणि इतर अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. हिंदू धर्मानुसार दिवाळी हा नवीन वर्षाची सुरुवात करणारा आणि प्रकाशाचा उत्सव म्हणून मानला जातो. या लेखात आपण दिवाळी सणाचा इतिहास, धार्मिकता, परंपरा आणि संस्कृतीबद्दल माहिती जाणून घेऊ. दिवाळीचे मूळ आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये आढळते. हा पाच दिवस चालणारा सण आहे, ज्यात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक विधींचा समावेश आहे. दिवाळीचा सण विविध पौराणिक कथा आणि धार्मिक घटनांशी जोडला गेला आहे, त्यात प्रमुखतः प्रभू श्रीराम यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांचा उल्लेख आहे.

100+ DIWALI Shubhechha in Marathi

रामायणातील कथा

DIWALI Shubhechha in Marathi |

रामायणानुसार, प्रभू श्रीरामाने आपल्या पतिव्रता पत्नी सीतेसह १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परत येण्याच्या दिवशी दिवाळीचा प्रारंभ झाला. या दिवशी अयोध्येच्या जनतेने आपला प्रिय राजा रामचंद्रांचे भव्य स्वागत केले. घराघरात दिवे लावून मोठा उत्सव साजरा केला होता. त्यामुळेच दिवाळी हा आनंद आणि विजयाचा उत्सव मानला जातो.

महाभारतातील कथा

महाभारतातील कथेनुसार, पांडव जेव्हा आपल्या १२ वर्षांच्या वनवासातून परत आले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी नगरवासीयांनी दिवे लावले होते. या घटने नुसारही दिवाळी हा प्रकाशाचा आणि विजयाचा सण मानला जातो.

लक्ष्मी पूजन

दिवाळीच्या कालावधीत लक्ष्मी पूजनाला विशेष महत्त्व आहे. देवी लक्ष्मी ही संपत्ती, ऐश्वर्य आणि समृद्धीची देवी मानली जाते. दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी लक्ष्मी पूजन करण्यात येते, ज्याद्वारे प्रत्येक कुटुंबाला समृद्धी आणि आनंद लाभावा, अशी भावना व्यक्त होते.

दिवाळी सणाचे पाच दिवस

दिवाळी मध्ये पाच दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक विधी पार पाडले जातात.

  1. धनत्रयोदशी – या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते. ही पूजा आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्यासाठी केली जाते.
  2. नरक चतुर्दशी – भगवान श्रीकृष्णाने या दिवशी नरकासुर असुराचा अंत केला होता. या दिवशी अभ्यंग स्नानाची परंपरा आहे.
  3. लक्ष्मी पूजन – हा दिवस दिवाळीचा मुख्य दिवस मानला जातो. संध्याकाळी लक्ष्मी पूजन करून समृद्धीची देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.
  4. बली प्रतिपदा (पाडवा) – पाडवा हा दिवस पती-पत्नीच्या नात्याच्या सन्मानासाठी समर्पित आहे. अनेक ठिकाणी हा दिवस “गोवर्धन पूजन” म्हणूनही साजरा केला जातो.
  5. भाऊबीज – या दिवशी बहिण-भावाच्या नात्याचे महत्व साजरे केले जाते. बहिणी भावांच्या दीर्घायुष्याच्या कामना करतात.

दिवाळीचे सांस्कृतिक महत्त्व

दिवाळी हा केवळ धार्मिक सण नसून तो सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचाही प्रतीक आहे. या सणात लोक एकत्र येतात, एकमेकांचे अभिनंदन करतात, मिठाई वाटतात आणि प्रेमाचे बंध मजबूत करतात. दिवाळीमुळे केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक कार्य देखील सुसंगत होतात. दिवाळी हा सण केवळ प्रकाशाचा नाही तर आनंद, प्रेम आणि समृद्धीचा संदेश देणारा आहे. या सणात धर्म, संस्कृती आणि समाज यांचा विलोभनीय संगम दिसून येतो. आपल्या परंपरांना जपत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करणे काळाची गरज आहे.

100+ DIWALI Shubhechha in Marathi

DIWALI Shubhechha in Marathi


उटण्याचा सुगंध अन रांगोळीचा थाट,
दिव्यांची आरास आणि फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी सोबत आनंदाची लाट,
नूतन वर्षाची चाहूल झाली, आली दिवाळी पहाट..
शुभ दीपावली

पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवे क्षितीज, सोबत माझ्या
दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा!

दिपावली” आहे पर्व सुखांचं,
लक्ष्मी आपल्या घरी येण्याचं
या दिवाळीला तुम्हाला मिळो आयुष्यभराचा आनंद
लक्ष्मी पूजन, नरक चतुर्थी आणि
दिवाळी पहाटच्या
मन:पूर्वक शुभेच्छा”

लक्ष्मीचा हात असो,
सरस्वती ची साथ असो,
गणेशाचा निवास असो,
माता दुर्गेच्या आशीर्वादाने
तुमचे जीवन नेहमी उजळून जावो,
लक्ष्मी पूजनाच्या खूप – खूप शुभेच्छा!”

दिव्या मुळे मिळेल आनंदाचा प्रकाश,
संपत्ती आणि मनःशांती…
लक्ष्मीपूजनाच्या पावन
पर्वावर उघडेल, भाग्याचं दार,
दिवाळी आणि लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा”

शौर्यलक्ष्मी, धनलक्ष्मी,धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी या दीपावलीत या अष्टलक्ष्मी, तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत तुम्हास लक्ष्मी पूजनाच्या मनपूर्वक शुभेच्छा”

DIWALI Shubhechha in Marathi, DIWALI Shubhechha in Marathi, DIWALI Shubhechha in Marathi

दारी केली दिव्यांची आरास,
अंगणी फुलला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला हसले मन,
आला दिवाळी सण,
करा प्रेमाची स्वच्छंद उधळण..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

तेजोमय झाला प्रकाश आज,
सोनेरी किरणांचा सोनेरी अभिषेक खास,
रोजचेच सारे तरीही वाटे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी,
दिवाळीच्या शुभेच्छा खास

दिवाळीच्या
आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी,
उत्साही,
मंगलमय सणा निमित्त आपणास
व आपल्या परिवारास
मनः पूर्वक शुभेच्छा…

स्नेहाचा सुगंध छान दरवळला,
आनंदाचा सण आज आला.
विनंती आमची ईश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

50+ Birthday Wishes for Mother | आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Diwali Wishes in Marathi

दिपावली च्या शुभेच्छा… सस्नेह नमस्कार, दिपावली पासून ते भाऊबीज पर्यंत, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय सणा आपणास व आपल्या परिवारास दिवाळीच्या प्रकाशमय शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!


सुखं होवोत ओव्हरफ्लो, मस्ती कधी न होवो स्लो, धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव, असा होवो तुमचा दिवाळी सण छान.


हे माते तू ये कुंकवच्या पावलांनी, नाव तुझं जपतो सदैव, मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.

धनाची पुजा…यशाचा प्रकाश… किर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपुजन, संबंधाचा फराळ, समृध्दीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज अशा या दिपावलीच्या आपल्या सहकुटुंब,सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा!!!

Diwali Wishes in Marathi

साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे! उत्तम दिनाचे महात्म्य आहे! सुखद ठरो हा छान पाडवा, त्यात असूदे अवीट गोडवा!

DIWALI Shubhechha in Marathi

तुम्हा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा!

आज बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा. राहो… सदा नात्यात प्रेमाचा गोडवा.

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!

दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे सारा, सोनपावलांनी सुखसमृद्धी येऊ दे घरा…दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

दिपावली पाडव्याच्या अगणित शुभेच्छा!

सगळा आनंद, सगळे सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता अन् सगळे ऐश्वर्य आपणास लाभू द… दिपावली – पाडव्याच्या शुभेच्छा!

साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे! उत्तम दिनाचे महात्म्य आहे! सुखद ठरो हा छान पाडवा, त्यात असूदे अवीट गोडवा…

दिव्यांची आरास मनात वाढवी उल्हास,
अशा दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा…तुमच्यासाठी खास

तुम्हा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच या शुभदिनी सदिच्छा!

आज बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा. राहो सदा नात्यात गोडवा.

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!

दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे, सोनपावलांनी सुखसमृद्धी येऊ दे…दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

Diwali Padwa Wishes For Husband In Marathi | नवऱ्यासाठी दिवाळी पाडवा शुभेच्छा

diwali padwa wishes for husband in marathi (diwali padwa wishes for husband in marathi).

दिवाळी पाडव्याच्या या मंगलमय दिनी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला भरभरून शुभेच्छा!

DIWALI Shubhechha in Marathi

पहिला दिवा लागेल दारी, सुखाचा किरण येईल घरी
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा, तुम्हा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आनंदाचा सण आला, विनंती आहे परमेश्वराला
सौख्य, समृद्धी लाभो सदा तुम्हाला, दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

आपुलकीच्या नात्यात लाभू दे फराळाचा गोडवा
सुख-समृद्धी घेऊन येतो दिवाळीचा पाडवा…

दिपावली आहे खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास…
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास…

दिवाळी पाडव्याच्या आपल्या सहकुटुंब, सहपरिवास सोनेरी शुभेच्छा!

ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो..
सर्वांना बलिप्रतिपदा,
दिपावली पाडव्याच्या खूप-खूप शुभेच्छा…

आली दिवाळी उजळला देव्हारा, अंधारात आहे पणत्यांचा पहारा
प्रेमाचा संदेश मनी रूजवा, आनंदी आनंद दिवसागणिक वाढवा – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

नभी सजला मोतियांचा चुडा, दारी दिव्यांचा सोनेरी सडा
गंध गहिरा दरवळला उटण्याचा, आता दिपावली सण आनंद लुटण्याचा…दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

आला पाडवा, चला सजवूया रांगोळ्याच्या आराशी,
इच्छित लाभो सगळे मनी असे ते, सुखही नांदो पावलाशी – दिवाळी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

धनाची पूजा, यशाचा प्रकाश, किर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन
संबंधाचा फराळ आणि समृद्धीचा पाडवा – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

दिवाळी पाडव्याच्या समृद्ध दिवशी तुमच्याही आयुष्यात भरभरून आनंद यावा हीच सदिच्छा – दिवाळी पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!

तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी – बलिप्रतिपदा शुभेच्छा!

अंधाराला दूर लोटू, प्रकाशाला मारू मिठी
एक पणती आपल्यामधल्या निखळ नात्यासाठी – दिवाळी पाडव्याच्या अगणित शुभेच्छा…

थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला नेहमी मिळत राहो!
आपणांस व आपल्या कुटुंबियांना बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा!

पाडव्याच्या आगमनाने आपल्या आयुष्यात
सदैव गोडवा यावा! – दिवाळी पाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा!

तमसो मा ज्योतिर्गमय..
दिवाळी पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा

सुख, शांती,समाधान, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा, कीर्ती
या सात दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा…

स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

DIWALI Shubhechha in Marathi

50+ Birthday Wishes for Mother | आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत, आई जगदंब देवीच्या क्रुपेने, तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

पुन्हा एक नवे वर्ष…पुन्हा एक नवी आशा…तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा…नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट.. शुभ दिवाळी पाडवा!

सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आनंद घेऊन येतेच ती नेहमीसारखी आताही आली तिच्या येण्याने मने आनंदाने आनंदमय झाली सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून आनंदाची शुभ दिपावली. दिवाळी पाडवा शुभेच्छा!

सुखं होवोत ओव्हरफ्लो, मस्ती कधी न होवो स्लो, धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव, असा होवो तुमचा दिवाळी पाडव्याचा सण छान.

अंधार दूर झाला रात्रीसोबत, नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन, डोळे उघडा एक मेसेज आला आहे, दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन.

DIWALI Shubhechha in Marathi | DIWALI Shubhechha in Marathi |

हात पकडून पुन्हा खेळूया, आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा मारूया, विसरून जुने हेवे-दावे, चला मिळून दिवाळीचा पाडवा करूया साजरा
दिवे तेवत राहोत, आम्ही तुमच्या आठवणीत सदैव राहो, जोपर्यंत आहे आयुष्य हीच इच्छा आहे आमची, दिव्यांप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचे…दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा…

तुमच्यासोबत सदैव असो आनंद, कधी न होवो निराशा…आम्हा सगळ्यांकडून दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येक ठिकाणी आहे झगमगाट, पुन्हा आला प्रकाशाचा सण, तुम्हाला आमच्या आधी कोणी शुभेच्छा देण्याआधी आमच्याकडून दिवाळी पाडव्याचा हा आनंदी संदेश.

DIWALI Shubhechha in Marathi | DIWALI Shubhechha in Marathi | DIWALI Shubhechha in Marathi |

हसत राहा, हसता हसता दिपक लावा, जीवनात नवे आनंद आणा, दुःख विसरून सगळ्यांना मिठी मारा आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा. दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा…

दिव्यांच्या रोषणाईने उजळून जावं अंगण, फटाक्यांच्या आवाजाने आसमंत जावा भरून, अशीच यावी दिवाळी सर्वांकडे, सगळीकडे असावा आनंदाचा मौसम. दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

DIWALI Shubhechha in Marathi | DIWALI Shubhechha in Marathi |

सदा राहिलात हसतमुख तर रोजच आहे दिवाळी, तुमचा खिसा न होवो कधी रिकामा, मग भले येवो कितीही तंगी, मित्रांच्या आयुष्यात राहो सदैव खुशाली तेव्हाच असेल माझ्यासाठी खरा दिवाळीचा पाडवा!

दिवाळीच्या तुम्हाला याच शुभेच्छा की, तुम्ही मातीलाही हात लावल्यास तिचं सोनं होवो, हीच प्रार्थना आहे तुम्ही खूष रहावं आणि तुमचा आनंद द्विगुणित होवो. दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ, सर्व होवो प्रकाशमान असे दीप लावत जाऊ, गरजवंताच्या घरी येवो समृद्धी, हीच देवाच्या चरणी प्रार्थना, दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

50+ Best Birthday Wishes for Sister in Marathi | बहिणी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

दरवाजा उघडा आणि लक्ष्मीचं स्वागत करा, आपल्या मेंदूला आणि बुद्धीला गणेशासारखं बनवा. सर्वांना भरपूर शुभेच्छा द्या आणि दिवाळीचा आनंद लुटा आणि तुम्हा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

दीपावली आल्यावर काढा रांगोळी, लावा दिवे, फटाक्यांचा होवो धूमधडाका, तुम्हा सगळ्यांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

प्रेमाचे दीप जळो, प्रेमाच्या फुलबाज्या उडो, प्रेमाची उमलावी फुले, प्रेमाच्या पाकळ्या, प्रेमाची बासरी, प्रेमाच्या सनया-चौघडे, आनंदाचे दीप जळो, दुःखाची सावलीही न पडो. दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

आनंदादायी वाटणारे आकाशकंदिल, सुफळ जीवनासाठी सजावट, वाईटाचा नाश करण्यासाठी फटाके, यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मिठाई आणि देवाचे आभार मानण्यासाठी दिवाळीचे दिवे. दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

थोडंस हसू दिवाळीच्या आधी येऊ द्या चेहऱ्यावर, प्रत्येक दुःखाला विसरून जा या सणाअगोदर,
नका विचार करू कोणी दिलं दुःख, सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर.
तुमच्यासोबत सदैव असो आनंद, कधी न होवो निराशा…

दिवाळी आहे चला या दिवसाला बनवूया खास, डाएट वगैर विसरा आणि फराळाचा घ्या आस्वाद, पण हे करताना मित्रांनो शुभेच्छा द्यायला विसरू नका दिवाळीचा सण आहे खास. दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!


दिवाळीच्या नादात पाकिटाचाही करा विचार, फालतू खर्च होणार नाही यावर करा विचार, पण असं असलं तरी करू नका कंजूषी यार, दिवाळी आहे धूमधडाक्यात साजरी करूया – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

दीप जळत राहो मन मिळत राहो, मनातील गैरसमज निघून जावो, साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो, हा दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो. दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

धनाचा होवो वर्षाव, सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव, मिळो नेहमी समृद्धी अशी होवो खास तुमची आमची दिवाळी. दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

दिवाळीच्या शुभ सणाच्या निमित्ताने माझ्या शुभेच्छा करा कबुल, आनंदाच्या या वातावरणात मलाही करून घ्या सामील – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

DIWALI Shubhechha in Marathi, DIWALI Shubhechha in Marathi |

दिवाळी, पाडवा तुम्हीही करा खास. पाठवा आपल्या प्रियजनांना खास संदेश आणि मेसेज. करा यावर्षीचा पाडवा अधिक खास.

अश्याच शुभेच्छांचे अपडेट मिळवण्यासाठी कोकण कल्चर नक्की फॉलो करा.

दिवाळी आनंद, प्रकाश आणि संस्कृतीचा उत्सव

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Vinesh Phogat ने जाहीर केली निवृत्ती Golden boy ने रौप्य पदक जिंकत रचला इतिहास Neeraj Chopra Won Silver Medal मराठमोळ्या Avinash Sable ने रचला इतिहास पण मेडल हुकले. Mumbai’s most famous street food Famous places for Monsoon Trip in India