Vima Sakhi Yojana in Marathi : केंद्र सरकार तसेच राज्य सरकार देशातील जनतेसाठी अनेक महत्त्वकांक्षी योजना वेळोवेळी राबवत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या हरियाणा दौऱ्यात ९ डिसेंबर २०२४ रोजी Bima Sakhi Yojana विमा सखी योजना लॉन्च करून सदर योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण तसेच स्वावलंबना साठी ही योजना राबविण्यात येणार आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून जारी केलेल्या पत्रकारानुसार Vima Sakhi Yojana 2024 एलआयसी भारतीय जीवन विमा निगमचीच योजना आहे. या योजनेअंतर्गत दहावी पास महिला तसेच वय वर्ष १८-७० वर्षापर्यंतच्या महिलांच्या सशक्तिकरणाला गती मिळणार आहे. सदर योजनेच्या माध्यमातून साक्षरता आणि विमा जागृती बाबत महिलांना तीन वर्ष विशेष असे ट्रेनिंग दिले जाईल, सदरच्या काळात महिलांना स्टायपेंड ही शासनाद्वारे दिला जाणार आहे.
या योजनेत आगामी तीन वर्षात दोन लाख महिलांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न सरकार द्वारे केला जाणार तसेच तीन वर्षाच्या कालावधीनंतर महिला एलआयसी एजंट म्हणून देखील काम करू शकणार आहेत आणि आणि पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण असलेल्या महिलांना विमा सखींना एलआयसी मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी दिली जाणार आहे.
हे देखील वाचा – सोलर पॅनल योजना
Vima Sakhi Yojana in Marathi किती मिळणार स्टायपेंड
या योजनेच्या प्राथमिक टप्प्यात महिलांना ७००० रुपये तर दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी ६००० रुपये तर तिसऱ्या वर्षी दरमहा ५००० रुपये देण्यात येतील तसेच ज्या विमा सखी टार्गेट पूर्ण करतील त्यांना इन्सेंटिव्ह देखील दिला जाईल.
सदर योजनेमार्फत महिलांचे सशक्तिकरण करून रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. योजना सुरू झाल्यानंतर प्राथमिक टप्प्यात ३५ हजार महिलांना तसेच पुढील टप्प्यात ५० हजार महिलांना या योजनेमार्फत रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.