Types of Salt : अन्नपदार्थांमध्ये कुठल्याही पदार्थाला मिठाशिवाय चवदारपणा येत नाही पण मिठाचे अति सेवन देखील आरोग्यास हानिकारक ठरू शकते. त्यामुळे आहारात मिठाचा जपून वापर करणे कधीही चांगले.

आयुर्वेदामध्ये (Different types of salt) अनेक प्रकारच्या मिठांचा संदर्भ आढळून येतो, यामध्ये प्रामुख्याने शेंदेलोण मीठ, पादेलोण मीठ, बिडलवण मीठ, सांबरलोण मीठ, समुद्री काळे मीठ असे मिठाचे पाच प्रकार पाहायला मिळतात.
मिठाचे प्रकार ? Types of Salt
सैंधव मीठ
सैंधव मीठ आला शेंदेलोण मीठ असेही म्हणतात हे मीठ सैंधव खाणीतून मिळते, त्यामुळे नैसर्गिक रित्या पूर्णपणे शुद्ध असते. या मिठात खारटपणा कमी आणि आयोडीनचे प्रमाण अधिक असल्याने या मिठाचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. या मिठामध्ये लोह आणि गंधकाचा अंश आढळून येतो हे मीठ हलके आणि पचनासाठी चांगले असते, या मिठामुळे पचनक्रिया सुधारते आणि भूक वाढीसाठी मदत होते. तसेच या मिठामुळे शरीरातील पीएच पातळी योग्य राहण्यास मदत होते.

पादेलोण मीठ
या मिठाला संचल मीठ असेही म्हटले जाते. पादेलोण मीठ म्हणजे जमिनीतून मिळणारे एक प्रकारचे खनिजेच आहे. या मिठाचे खडक फोडून त्याचा चूर्ण करून हे मीठ बनवले जाते, या मिठामध्ये सोडियम क्लोराइड शिवाय मॅग्नेशियम कॅल्शियम यांचे देखील प्रमाण आढळून येते या मिठाचे गुलाबी रंगाचे खडे असतात. याची चव इतर मिठापेक्षा वेगळे असून गंधकामुळे या मिठाला एक विशिष्ट वास येतो.
बिडलवण मीठ
हे मीठ खाजना मधून प्राप्त होत असल्याने या मिठाला बिडलवण असे म्हटले जाते, याचा उपयोग पचनशक्ती वाढवण्यास तसेच गॅसेस, मुळव्याध, बद्धकोष्ठता आदी समस्यांवर या मिठाचे सेवन लाभकारी ठरते.
सांबरलोण मीठ
सांबर म्हणजे खाऱ्या जमिनीपासून काढलेले मीठ, जयपुर जवळ असलेल्या सांबर सरोवरातील पाण्यापासून या मिठाचे उत्पादन घेतले जाते या मिठाचा उपयोग आयुर्वेदिक औषध बनवण्यासाठी तसेच अपचन पचनशक्ती सुधारणे कावीळ वात त्वचारोग इत्यादी संबंधित औषधांमध्ये याचा वापर केला जातो काही हरबल तेलांमध्ये देखील या मिठाचा वापर केला जातो.
समुद्री काळे मीठ
समुद्री काळे मीठ हे इतर मिठांच्या तुलनेत अधिक खारट असते. या मिठामध्ये सोडियमचे मुबलक प्रमाण आढळून येते याला खडे मीठ / काळे मीठ असे देखील म्हटले जाते हे मीठ बहुतांश आहार पद्धतीमध्ये वापरले जाते या मिठापासूनच टेबल सॉल्ट म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातले मीठ तयार केले जाते. यामध्ये आयोडीनचे मुबलक प्रमाण आढळून येते.
मीठाचे फायदे
- मीठ हे शरीरातील पाण्याच्या संतुलनाला जपून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे आपल्या पेशी, ऊती आणि अवयवांमध्ये पुरेशे पाणी राहून शरीर स्वस्थ राहते.
- मीठ हे स्नायूंच्या संकुचनासाठी आवश्यक आहे. पुरेशे सोडियम नसल्यास स्नायूंमध्ये दुखणे किंवा कमजोरी येऊ शकते.
- मीठ हे आम्ल (हायड्रोक्लोरिक आम्ल) निर्मितीला मदत करते, जे आपल्या अन्नाचे पचन करण्यास आवश्यक आहे.
मीठ हे तरल संतुलन, तंत्रिका क्रिया, स्नायूंची संकुचन क्रिया आणि इतर शारीरिक क्रियांसाठी आवश्यक आहे. परंतु, अति प्रमाणात मीठ घेणे हे उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि मूत्रपिंड संबंधित आजारांसाठी कारणीभूत होऊ शकते. मीठ हे शरीरासाठी आवश्यक आहे, पण त्याचा वापर मर्यादित प्रमाणात करणे आवश्यक आहे.
हे देखील वाचा – Superfood benefits in Marathi