Tata Avinya X Info in marathi : भारतीय बाजारपेठेत टाटा मोटर्सने केलेले कम बॅक हे पाहण्यासारखे आहे. टाटा मोटर्स ने मागील ४० वर्षात पहिल्यांदा सुझुकीला मागे टाकून विक्रीच्या बाबतीत अनोखा विक्रम केला.
टाटा मोटर्स भारतात अनेक प्रकारच्या वाहनांची विक्री करतात. टाटा मोटर्स कडे रिलायबिलिटी आणि सुरक्षितता म्हणून पाहिले जाते, टाटा कंपनीची वाहने ही आपल्या धाकड बिल्ड क्वालिटी साठी ओळखली जातात.
भारतीय बाजारपेठेत सध्या टाटा पंच, टाटा नेक्सॉन, टाटा नेक्सॉन ईव्ही यांची विक्रमी विक्री होताना दिसत आहे अनेक बऱ्याच दशकानंतर टाटा मोटर्सने सुझुकी मोटर्सला मागे टाकून विक्रीच्या बाबतीत वरचा क्रमांक मिळवला. टाटा कंपनीने आपल्या वाहनांमध्ये केलेल्या महत्त्वपूर्ण बदलांमुळे आणि सुरक्षिततेमुळे लोकांचा विश्वास देखील टाटा मोटर्स वर वाढला.
Tata Avinya X Info in Marathi
भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो २०२५, नोएडा येथे झालेल्या या ग्लोबल एक्सपोमध्ये अनेक कंपन्यांनी आपली प्रोटो टाईप, कन्सेप्ट वेहिकल प्रदर्शित केले होते. अनेक कंपन्यांनी वेगवेगळी वाहने या एक्सपोमध्ये प्रदर्शनासाठी ठेवली होती.
या सर्वांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले ते टाटा मोटर्सची Tata Avinya X एकदम फ्युचरीस्टिक डिझाईन जी जेएलआर इ एम ए या प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे. टाटा मोटर्सने आपल्या प्रीमियम लक्झरी सेगमेंट मधील ही ईव्ही ५०० किलोमीटर पेक्षा अधिकची रेंज देण्यास सक्षम असेल तसेच यामध्ये दमदार बॅटरी आणि ॲडव्हान्स सेफ्टी फीचर ही असतील.
यामध्ये एडीएस लेवल २ ऍडव्हान्स फीचर्स सह इंटिरियर मध्ये ड्युअल टोन सॉफ्ट लेदर टच, आधुनिक इन्फोटेनमेंट सिस्टीम, डॅशबोर्ड एकदम सुटसुटीत असून प्रीमियम लुक प्रदान करतो. रेंज रोवर सारखे साम्य अविन्याच्या इंटेरियर डिझाईन मध्ये दिसून येते.
चांगला ग्राउंड क्लिअरन्स, डायमंड कट आलॉय व्हील आणि शार्प कट्स या कारला चांगला लुक प्रदान करतात. याच्या टी-सिग्नेचर लाइट्स लक्ष वेधून घेतात. सर्वप्रथम टाटा अविन्याचे कन्सेप्ट वर्जन हे 2022 मध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. त्यामध्ये बदल करून आता 2025 मध्ये टाटा अविन्या एक्स भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो मध्ये प्रदर्शित करण्यात आले.
हे देखील वाचा – टाटा सिएरा एका सिंगल चार्ज मध्ये धावणार ५९० किलोमीटर
अविन्या एक्स सारखी दमदार इलेक्ट्रिक लक्झरी एसयूव्ही ही २०२६ च्या आसपास भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. आणि याची किंमत साधारण ४० लाख एक्स शोरूम अपेक्षित आहे.