Stree 2 Released Date out : सध्या बॉलीवूडमध्ये कल्की या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. कलियुगावर आधारित या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. त्यामध्ये दक्षिणात्य सुपरस्टार प्रभास सह बरीच स्टारकास्ट आहे. तसेच आता स्त्री २ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील समोर आली आहे हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
Stree 2 Released Date out हॉरर आणि कॉमेडीचा अनोखा संगम असलेल्या स्त्री या चित्रपटाने २०१८ मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर बरीच लोकप्रियता मिळवली होती. यामध्ये प्रमुख भूमिकेत राजकुमार राव, श्रद्धा कपूर, अपारशक्ति खुराना, आणि पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला. आता ‘स्त्री २ ‘ चित्रपटाच्या प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू आहे अनेक ठिकाणी याचे प्रमोशन करताना या चित्रपटातील स्टारकास्ट दिसत आहे. चाहते देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
स्त्री २ चित्रपटाची कथा या अगोदर २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या स्त्री चित्रपटाच्या पुढे सुरू होते. पहिल्या भागात आपण पाहिले की, चंदेरी नावाच्या गावात एक आत्मा पुरुषांना रात्रीच्या वेळी उचलून नेत असे पुढे अनेक रोचक ट्विस्ट सह कथेमध्ये त्या आत्म्याचे रहस्य उलगडण्यात आले. ‘स्त्री २’ मध्ये या आत्म्याचा पुढील प्रवास आणि त्याच्या मागील कथेचा उलगडा करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
Stree 2 Released Date Out- स्टारकास्ट आणि दिग्दर्शन
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर या चित्रपटात आपणास पुन्हा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या सोबतच पंकज त्रिपाठी, अपारशक्ति खुराना, आणि अभिषेक बॅनर्जी यांची देखील महत्त्वाची भूमिका असणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक करत आहेत, ज्यांनी स्त्री चा पहिला भागही दिग्दर्शित केला होता.
रिलीजची तारीख: हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट ला चित्रपट गृहात प्रदर्शित होईल, पहिल्या भागाने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे ‘Stree 2’ बद्दलच्या अपेक्षा खूपच जास्त आहेत. चाहत्यांना आशा आहे की, हा चित्रपट पहिल्या भागापेक्षा अधिक रोमांचक आणि मनोरंजक असेल. चित्रपटाचा ट्रेलर देखील यूट्यूब वर लाँच करण्यात आला आहे. त्याला देखील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
‘Stree’ चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. ‘Stree 2’ मधील संगीतासाठी देखील तितकीच मेहनत घेतली आहे. संगीतकार जोडी सचिन-जिगर यांनी चित्रपटाच्या गाण्यांना संगीत दिले आहे.
‘Stree 2’ चित्रपटाबद्दल सोशल मीडियावरही भरपूर चर्चा आहे.
‘Stree 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आधीच उत्सुकता निर्माण केलेल्या कथानकाला पुढे नेण्याचा आणि नवीन रहस्ये उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. या चित्रपटाच्या प्रत्येक अपडेटची उत्सुकतेने वाट पाहत असलेल्या चाहत्यांसाठी हा एक खास अनुभव असेल.
असेच मनोरंजनाचे अपडेट मिळवण्यासाठी Kokan Culture ला नक्की फॉलो करा आणि सादर लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा