Spiny Gourd benefits in Marathi : कोकण आणि तळ कोकणामध्ये आढळणाऱ्या हंगामी भाज्या या खूप प्रसिद्ध आहेत. जून ते सप्टेंबर दरम्यान खूप साऱ्या भाज्या त्या निसर्गात मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. या भाज्यांचे सेवन हे आरोग्यासाठी चांगले असते. नैसर्गिकरीत्या प्रथिनांचा स्त्रोत या भाज्यांमार्फत आपणास मिळतो. यामध्ये टाकळा, अळू / तेरा, माठ, भारंगी, करटोली इत्यादी. कोकणात निसर्गाच्या रूपांमध्ये जशी विविध आढळून येते तशीच विविधता येथील वनस्पतीमध्ये देखील आढळून येते. कोकणात विविध प्रकारच्या रानभाज्या वेगवेगळ्या हंगामात आढळतात. यात टाकळा, कुर्डू, सुरण, काटळ /करटोली इत्यादी रानभाज्यांचा समावेश होतो. या भाज्या जंगलात आणि डोंगरात वाढतात आणि त्यांच्या वाढीसाठी विशेष प्रकारच्या माती व वातावरणाची गरज असते, ज्यामुळे त्यांना अनोखी चव आणि गुणधर्म प्राप्त होतात.
Spiny Gourd benefits in Marathi
महाराष्ट्राला नैसर्गिक साधन संपत्ती ही भरभरून लाभली आहे, कोकण पट्ट्यामध्ये पावसाळी हंगामात शेतीच्या कामानंतर अनेक भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात आणि कोकणी बांधव यांचे सेवन देखील करतात. या लेखामध्ये आपण कारल्याच्या प्रजातीतील एक नैसर्गिक भाजी करटोली (Spiny Gourd) च्या सेवनाचे फायदे या लेखात जाणून घेऊ ही भाजी कारल्याच्या प्रजातीतील असूनही कारल्या इतकी कडवट नसते.
पावसाळा ऋतूमध्ये बाजारात आपणास अनेक रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या दिसून येतात, यापैकी कारल्याच्या प्रजातीतील करटोली ही प्रसिद्ध अशी रानभाजी देखील दिसून येते. तिचे बाह्य आवरण हिरवट काटेरी असते. या भाजीला वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी नावे आहेत. तिचे शास्त्रीय नाव Momordica Dioica आहे.
आरोग्यदायी घटक
ही भाजी आरोग्यासाठी अतिशय चांगली असून त्यामध्ये प्रथिने, लोह, विटामिन ए, बी १, बी ३, बी ६, बी ९, बी १२ याचे मुबलक प्रमाण आढळून येते. याशिवाय विटामिन डी २, ३, विटामिन एच, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कोपर आढळून येते. याची भाजी चविष्ट असून आरोग्यदायी आहे. याशिवाय या भाजीमध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात आणि ही भाजी पचायला हलकी असते.
आरोग्यदायी फायदे
Spiny Gourd benefits in Marathi : आयुर्वेदामध्ये देखील करटोली ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही भाजी बद्धकोष्ठता आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. शिवाय डायबिटीस-रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास या भाजीची मदत होते. केस गळती, मुळव्याध, डायबिटीस, अर्धांग वायू, ताप, डोळ्यांच्या व्याधी, ब्लड प्रेशर इत्यादींवर ही भाजी गुणकारी आहे. तसेच या भाजीच्या सेवनाने कॅन्सर हृदय विकार यांचा धोका देखील कमी होतो. ही भाजी हंगामी असून ठराविक हंगामातच उपलब्ध होते. कोकणातील जंगलांमध्ये ही भाजी नैसर्गिक रित्या आढळून येते. ही भाजी मिळण्याचा काळ हा जून ते सप्टेंबर असून या काळात या भाजीच्या वेलीवर कारल्यासारखी मध्यम आकाराची गोलसर काटेरी फळे लागतात.