Royal Enfield Himalayan 450 |Himalayan 450 | Royal Enfield Himalayan 411 | Royal Enfield Himalayan Update | Royal Enfield Himalayan 450 Features | Royal Enfield Himalayan 450 Launch date | Royal Enfield Himalayan 450 waiting period | Royal Enfield scram 411 | Royal Enfield Classic 350 | Royal Enfield Himalayan |
Royal Enfield Himalayan 450 आयशर कंपनी ही दुचाकी व्यतिरिक्त गिअर्स आणि व्यावसायिक वाहनांची निर्मिती करते. आयशर कंपनीची मालकी असलेली रॉयल एनफिल्ड ही भारतातील दुचाकी बनवणारी अग्रगण्य कंपनी आहे. रॉयल एनफिल्ड ही सध्या ५० हून अधिक देशात आपल्या दुचाकी विकते, रॉयल एनफिल्ड च्या अनेक बाईक आज बा जारात आहेत. Classic 350, Meteor 350, Hunter 350, Scram 411, Continental, Interceptor, Himalayan 411, Himalayan 450,Shotgun 650, Bullet 350, Bullet 650, Classic 650 इत्यादी, जागतिक विक्रीमध्ये रॉयल एनफिल्डने हार्ले डेव्हिडसन कंपनीला देखील मागे टाकले आहे. तसेच आता लॉन्च झालेली हिमालयन ४५० ही देखील चर्चेचा विषय बनली आहे. हिमालयन ४५० ही अगोदरच्या हिमालयन ची सक्सेसर आहे असे आपण म्हणू शकतो.
सदर लेखात आपण हिमालयन ४५० बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये २१ इंच आणि १७ इंच ट्यूबलेस टायर मिळतात, जे सीएट आणि रॉयल एनफिल्ड यांनी मिळून विकसित केले आहेत, महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये आपणास ट्यूबलेस टायर मिळतात. यापूर्वीच्या हिमालयन मध्ये ट्यूबलेस टायर येत नव्हते. त्यामुळे रायडर्स ना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असे, यामध्ये शोवा चे अपसाईट डाऊन फोर्क्स मिळतात तसेच दुचाकीची फिट अँड फिनिश अतिशय उत्तम आहे. या नवीन हिमालयन मध्ये बेस, पास आणि समिट असे तीन पाहायला मिळतात. या मोटरसायकलची स्पर्धा ही थेट केटीएम ३९० एडवेंचर, बीएमडब्ल्यू जी ३१० जी.एस, ट्रॅम्प स्क्रॅम्ब्लर ४०० एक्स, एझडी एडवेंचर यासोबत असेल.
Royal Enfield Himalayan 450 सर्वसाधारण माहिती
मायलेज | – |
डिस्प्लेसमेंट | ४५२ cc |
इंडियन टाईप | लिक्विड कूल, सिंगल सिलेंडर, फोर वॉल्व, DOHC |
सिलेंडर | १ |
पाॅवर | ४०.०२ पी.एस.@ ८००० rpm |
टॉर्क | ४० एन.एम.टॉर्क @ ५५०० rpm |
फ्रंट ब्रेक | ३२० डिस्क |
रिअर ब्रेक | २७० डिस्क |
फ्युल टँक | १७ लिटर |
बॉडी टाईप | एडवेंचर टूरर |
ए.बी.एस. | ड्युअल चॅनेल, स्विचेबल (अँटी ब्रेक लॉकिंग सिस्टीम) |
कनेक्टिव्हिटी | ब्लूटूथ |
रायडिंग मोड | Yes – मल्टिपल |
नेव्हीगेशन असिस्ट | Yes |
स्पीडोमीटर, ओडोमीटर, ट्रिप मीटर, टॅकोमीटर | डिजिटल |
डायमेन्शन | Width 852 mm, Lenght 2245 mm, Height 1316 mm |
ग्राउंड क्लिअरन्स | २३० mm |
वजन | १९६ किलो |
ड्राईव्ह टाईप | चेन ड्राईव्ह |
ट्रान्समिशन | मॅन्युअल |
Royal Enfield Himalayan 450 इंजिन
Himalayan 450 मध्ये मित्रांनो ४५२ cc इंजिन मिळतं त्याला शेरपा ४५० हे कोड नाव दिले आहे. यामध्ये लिक्विड कुल्ड, सिंगल सिलेंडर, फोर वॉल्व इंजिन जे ४०.०२ पी.एस.@८००० rpm पाॅवर आणि ४० एन.एम.टॉर्क @५५०० rpm जनरेट करते. हे रॉयल एनफिल्डने पूर्णतः नवीन असे इंजिन डेव्हलप केले आहे. खास करून ऑफ रोडींग आणि घाटमाथ्यां वरील रस्त्यांसाठी तसेच टुरिंग साठी बनवले गेले आहे, ते तुम्हाला खराब रस्त्यांवरही चांगला अनुभव देते.
कनेक्टिव्हिटी
कनेक्टिव्हिटी पर्याय मध्ये आपणास ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळते. तसेच नेव्हिगेशन असिस्ट देखील मिळते.
ग्राउंड क्लिअरन्स
या एडवेंचर टूरर बाईक मध्ये तुम्हाला २३० एम.एम. चा ग्राउंड क्लिअरन्स मिळतो जो चांगली ऑफ रोडिंग साठी आपणास मदत करतो.
ब्रेक आणि ए.बी.एस.
हिमालयन ४५० मध्ये फ्रंट ब्रेक ३२० mm डिस्क तसेच रिअर ब्रेक २७० mm डिस्क सह ड्युअल चॅनेल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम मिळते, जी पूर्णतः आपण कंट्रोल करू शकतो. ए.बी.एस. ची गरज नसल्यास आपण ते बंद करू शकतो. स्विचेबल ए.बी.एस. चा पर्याय मिळतो.
रायडिंग कंफर्ट
रॉयल एनफिल्ड हिमालयन ४५० मध्ये मल्टिपल रायडिंग मोड मिळतात, तसेच नेव्हिगेशन असिस्ट आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यामुळे आपली राईड सोयीस्कर होण्यास मदत होते, स्पीडोमीटर, ओडोमीटर, ट्रिप मीटर, टॅकोमीटर डिजिटल मिळतात, यासोबतच गिअर पोझिशन इंडिकेटर, रियल टाईम मायलेज असे अनेक फीचर्स मिळतात. हिमालयन ४५० मध्ये ऍडजेस्टेबल सीट मिळते, जी तुम्ही तुमच्या कम्फर्ट/ उंचीनुसार नुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता. हिमालयनमध्ये स्प्लीट सीट मिळते. १७ लिटर फ्युल टँक मुळे तुम्ही एका फुल टँक मध्ये सरासरी ६०० ते ६५० किलोमीटर अंतर कापू शकता.आणि ६ स्पीड गिअर बॉक्स स्लीपर क्लच सह ४५२ cc पावरफुल इंजिन मुळे तुम्ही प्रवासाची अगणित मजा घेऊ शकता.
Royal Enfield Himalayan 450 व्हेरिएंट आणि किमती
क्र. | व्हेरिएंट | किंमत एक्स शोरूम |
---|---|---|
१. | हिमालयन ४५० बेस | २,६९,०००/- |
२. | हिमालयन ४५० पास | २,७४,०००/- |
३. | हिमालयन ४५० समिट | २,७९,०००/- |
४. | हिमालयन ४५० हॅन्ले ब्लॅक | २,८४,०००/- |
वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या किमती असू शकतात.
उपलब्ध कलर
Hanle Black | Kamet White | Slate Poppy Blue | Slate Himalayan Salt | Kaza Brown |
वरील पाच रंगांमध्ये हिमालयान ४५० उपलब्ध आहे.
हिमालयन ४११ मधील सर्व त्रुटी दूर करून पूर्णतः नवीन आणि लहानात लहान गोष्टीचा विचार करून दमदार रगेड मोटारसायकल रॉयल एनफिल्डने विकसित केली आहे. सध्या हिमालयन ४५० साठी दोन ते तीन महिन्याचा वेटिंग पिरेड आहे. बुकिंग नंतर तीन महिन्यानंतर तुम्हाला बाईकची डिलिव्हरी मिळू शकते.
Royal Enfield Official Website – क्लिक करा.
Pingback: Royal Enfield Classic 350 info in Marathi