New Suzuki Swift facelift 2024 info in Marathi : Suzuki ने आपल्या लोकप्रिय हॅचबॅक Swift चे २०२४ चे फेसलिफ्ट मॉडेल CNG पर्याया सह केले आहे. नवीन Suzuki Swift हि अधिक आकर्षक, स्टायलिश, तसेच दैनंदिन वापरासाठी सोयीस्कर बनवण्यात आली आहे. आधुनिक नवीन डिझाइन, अत्याधुनिक फिचर्स, व सुधारित सुरक्षा तंत्रज्ञानासह हे मॉडेल भारतीय बाजारात ग्राहकांच्या पसंतीस येणार आहे. सुझुकीने भारतीय बाजारात भारतीयांच्या मानसिकतेला अनुसरून कमी किमतीमध्ये दमदार मायलेज सह दमदार लुक देऊन भारतीयांच्या मनावर गेले अनेक दशके राज्य केले आहे. भारतात सुझुकीच्या कार्स विक्रीच्या बाबतीत इतर कंपन्यांच्या तुलनेने वरचढ आहे. भारतीय बाजारपेठेत सुझुकीचा सेल्स हा नेहमीच चांगला राहिला आहे. पण आता भारतात टाटा मोटर्सने एकापेक्षा एक दमदार कार्स लॉन्च करून सुजकीला चांगली टक्कर दिली आहे. या लेखात आपण Swift Facelift 2024 चे संपूर्ण माहिती, किंमत, फिचर्स, स्पेसिफिकेशन्स, डिझाइन, सेफ्टी व विश्वसनीयता याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊ आहोत.
new suzuki swift facelift 2024 info in Marathi, Swift Facelift चे वेगवेगळे व्हेरिएंट्स भारतात उपलब्ध आहेत. नवीन मॉडेलच्या बेसिक व्हेरिएंटची किंमत सुमारे ₹ ६.५ लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि याचे टॉप मॉडेल ₹ ८.५ लाखांपर्यंत जाऊ शकते. कंपनीने ग्राहकांच्या अपेक्षांनुसार कमी बजेट असलेले व अधिक फीचर्स असलेले विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
New Suzuki Swift facelift 2024 info in Marathi – स्पेसिफिकेशन
इंजिन – नवीन Suzuki Swift मध्ये सुधारित १.२ लिटर झेड सिरीज पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, ज्यामुळे गाडीची पॉवर अधिक वाढली आहे. यामध्ये इंधन पर्याय पेट्रोल सह सीएनजी देखील ऑफर करण्यात आला आहे.
पॉवर आणि टॉर्क – हे इंजिन ८९ बीएचपी पॉवर आणि ११३ एन एम टॉर्क जनरेट करते.
गिअरबॉक्स – ऑप्शन ५ स्पीड मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे ड्रायव्हिंग अधिक आरामदायी होते.
माइलेज – फेसलिफ्ट Swift चा मायलेज २३-२४ kmpl इतका मिळतो, ज्यामुळे इंधनावर कमी खर्च होतो.
New Suzuki Swift facelift 2024 info in Marathi – फीचर्स
Suzuki ने आपल्या नवीन Swift मध्ये अत्याधुनिक फीचर्स समाविष्ट केले आहेत.
- टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम: नवीन Swift मध्ये 7-इंचाची टचस्क्रीन सिस्टम आहे, जी Apple CarPlay आणि Android Auto सपोर्ट करते.
- क्लायमेट कंट्रोल : ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सिस्टम समाविष्ट केलेली आहे, ज्यामुळे प्रवास अधिक आरामदायक होतो.
- क्रूझ कंट्रोल: गाडीला दीर्घ प्रवासासाठी क्रूझ कंट्रोल फीचर आहे, जे ड्रायव्हरला आराम देते.
- कीलेस एंट्री व पुश बटन स्टार्ट: वापरण्यास सोयीस्कर फीचर्स उपलब्ध आहेत, जे ड्रायव्हरच्या अनुभवात भर घालतात.
- ॲडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टीम (ADAS): यात काही वेरिएंट्समध्ये ADAS टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित व सोयीस्कर होते.
हे देखील वाचा – New Suzuki Dzire 2024
डिझाइन व लुक्स
2024 च्या Swift फेसलिफ्टमध्ये मॉडर्न व स्पोर्टी लुक देण्यात आला आहे, ज्यामुळे ती अधिक आकर्षक वाटते. यात सुधारित ग्रिल, नवीन एलईडी हेडलाइट्स आणि स्टायलिश टेललॅम्प्स देण्यात आले आहेत. नवीन अलॉय व्हील्स आणि ट्वीक्ड बंपर डिझाइनमुळे गाडीची उपस्थिती अधिकच उठून दिसते. गाडीची इन्टेरियर डिझाइनही सुधारण्यात आली आहे. ब्लॅक-रेड थीममुळे गाडीच्या इन्टेरियरला प्रीमियम लुक मिळतो.
सुरक्षा
Suzuki Swift Facelift 2024 मध्ये सेफ्टीची अधिक काळजी घेतली आहे. येथे काही मुख्य सेफ्टी फीचर्सची यादी दिली आहे:
- ड्युअल फ्रंट एअरबॅग्स: सर्व व्हेरिएंट्समध्ये स्टॅंडर्ड एअरबॅग्स उपलब्ध आहेत.
- एबीएस विथ ईबीडी: ब्रेकिंग सिस्टम अधिक प्रभावी करण्यासाठी एबीएस आणि ईबीडी वापरले आहे.
- इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP): हायवेवर आणि वळणांवर अधिक स्थिरता मिळण्यासाठी ESP चा समावेश केला आहे.
- रियर पार्किंग सेंसर्स व कॅमेरा: पार्किंग करणे सोपे व्हावे म्हणून रियर पार्किंग सेंसर्स आणि कॅमेरा दिलेला आहे.
- ADAS फीचर्स: टॉप मॉडेल्समध्ये ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स टेक्नोलॉजी देण्यात आले आहे. अडपटिव्ह क्रूज कंट्रोल, लेन असिस्ट, पेडस्ट्रियन अँड क्रॉस ट्राफिक सपोर्ट इत्यादी.
या नवीन स्विफ्ट ला युरो एन्कॅप क्रॅश टेस्टमध्ये ३ स्टार रेटिंग मिळाली आहे. सुझुकीची बिल्ड क्वालिटी ही तितकीशी चांगली नाही. वाहनांचा परफॉर्मन्स आणि मायलेज वाढवण्यासाठी सुझुकी आपली वाहने कमी वजनदार हलकी बनवते.
हे देखील वाचा – New Maruti Suzuki Ertiga 2024
new suzuki swift facelift 2024 info in marathi
Suzuki Swift ही नेहमीच तिच्या विश्वासार्हतेसाठी ओळखली जाते, व नवीन फेसलिफ्ट मॉडेल यामध्ये काहीच बदल करत नाही. यात सुधारित इंजिन व ड्रायव्हिंग तंत्रज्ञानामुळे शहरातील व हायवेवरील ड्रायव्हिंग अनुभव अधिकच सुखद व मजेशीर झाला आहे. Swift चे सस्पेन्शन सेट-अप व हाय ग्राउंड क्लिअरन्समुळे गाडी खराब रस्त्यांवरही सहज धावते. याचे मॅनेजमेंट व कंट्रोल फीचर्स सुधारणे केले गेले आहेत, ज्यामुळे ती एक विश्वासार्ह व मजबूत वाहन ठरते.
Suzuki Swift Facelift 2024 हे मॉडेल तरुण पिढीच्या अपेक्षांना पूर्ण करणारे आहे. स्टायलिश डिझाइन, अत्याधुनिक फिचर्स, सेफ्टी व कमी इंधन वापराच्या दृष्टीकोनातून हे मॉडेल किफायतशीर ठरते. Suzuki Motors ने त्यांच्या पारंपरिक विश्वासार्हतेला अनुसरून यामध्ये अनेक सुधारणांची भर घातली आहे.
हे देखील वाचा – konkan ved