New suzuki Cervo 2024 : भारतीय बाजारात लॉन्च होत आहे, सुझुकीची सगळ्यात स्वस्त फॅमिली कार. मारुती सुझुकीची suzuki Cervo ही बजेट कार येणाऱ्या काही काळात भारतीय रस्त्यांवर दिसू शकते. तशी सुझुकीने तयारी देखील केली आहे अनेकदा टेस्टिंग दरम्यान या कारला भारतीय रस्त्यांवर पाहिले गेले आहे.
New suzuki Cervo 2024
मारुती सुझुकी आपल्या दमदार मायलेज देणाऱ्या कार साठी संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे आणि सर्वसामान्याला परवडणाऱ्या किमतीत कार लॉन्च करून सर्वसामान्यांचे कारचे स्वप्न सुझुकी पूर्ण करत आहेत. सुझुकीच्या अनेक कार भारतीय बाजारात आपणास पाहायला मिळतात. संपूर्ण भारतभर सर्विस सेंटर आणि स्वस्त पार्ट्स यामुळे भारतात सगळ्यात जास्त विक्री होणाऱ्या कार्स म्हणून मारुती सुझुकी कडे पाहिले जाते. अलीकडे भारतीय बाजारात टाटा मोटर्स ने देखील किफायतशीर किमतीत दर्जेदार वाहने लॉन्च करून मारुती सुझुकी ला तगडे आव्हान दिले आहे. त्यामुळे मारुतीच्या सेल्सवर परिणाम झालेला दिसतो.
मारुतीने भारतीय बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी तीन ते पाच लाख पर्यंत बजेट सेगमेंट मध्ये अल्टो ल रिप्लेस करून नवीन कार भारतीय बाजारपेठेत लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. suzuki Cervo या कारमध्ये कॉम्पॅक्ट डिझाईन सह आधुनिक फीचर्स ऑफर करण्यात येतील सध्या तिचा टेस्टिंग फेज चालू असल्याने पुढील ३ ते ४ महिन्यांमध्ये भारतीय बाजारपेठेत ही कार विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. या कारमध्ये नवीन जनरेशन डिझाईन सह लेटेस्ट इंटेरियर फीचर्स देखील ऑफर करण्यात येतील. तसेच Cervo मध्ये हाय परफॉर्मन्स इंजिन ऑफर केले जाऊ शकते. 5 सीटर कार मध्ये Cervo हा एक चांगला पर्याय फॅमिली साठी ठरू शकतो.
रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 ला टक्कर देणारी होंडची ही नवीन बाईक पाहिली का?
New suzuki Cervo 2024 फीचर्स
इतर फीचर्स मध्ये पाहाल तर समोर स्क्वेअर टाईप एलईडी प्रोजेक्टर आणि डी आर एल ऑफर करण्यात आले आहेत याचे डिझाईन काहीसे बॉक्सी टाईप असून कॉम्पॅक्ट आहे. इंटेरियर मध्ये आकर्षक डॅशबोर्ड सह अड्जस्टेबल लेदर सीड्स ऑफर करण्यात आले आहेत. मल्टी फंक्शन पॉवर स्टेरिंग, ऑटो क्लायमेट कंट्रोल, ड्युअल झोन एसी, जेबीएल साऊंड सिस्टिम सह दहा इंच इन्फोटेनमेंट सिस्टीम ऑफर करण्यात आली आहे.
New suzuki Cervo 2024 इंजिन स्पेसिफिकेशन
इंजिन स्पेसिफिकेशन पाहायचे झाले तर यामध्ये सुझुकी च नवीन इंजिन १.८ लीटर के सिरीजचा ४ सिलेंडर पेट्रोल इंजिन पर्याय यामध्ये मिळू शकतो. यामध्ये सीएनजी पर्याय उपलब्ध होईल की नाही हे लॉन्चिंग नंतरच स्पष्ट होईल. या नवीन suzuki Cervo 2024 मध्ये दमदार असा ३५ के एम पी एल चा मायलेज कंपनी क्लेम करत आहे. येत्या ३ ते ४ महिन्यांमध्ये ही कार सुझुकीकडून लॉन्च केली जाऊ शकते.