Microsoft Windows Crash info in Marathi : संपूर्ण जगभरात लॅपटॉप आणि डेस्कटॉप काल सकाळपासून ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (BSOD) चे शिकार होत आहेत. सायबर सुरक्षा कंपनीने सांगितलेल्या एका अपडेट नंतर, मायक्रोसॉफ्ट विंडोज वर चालणारे सर्व कम्प्युटर लॅपटॉप अचानक बंद होत आहेत. काम करत असताना स्क्रीनवर अचानक ब्लू स्क्रीन येऊन लॅपटॉप किंवा कम्प्युटर अचानक बंद होणे हे सतत होत आहे. या प्रक्रियेलाच ब्लू स्क्रीन ऑफ डेथ असे म्हटले जाते.
आज सकाळपासून अनेक युजर्स ना ब्लू स्क्रीन दिसत आहे स्क्रीनवर युवर पीसी रन इनटू अ प्रॉब्लेम अँड नीड टू रिस्टार्ट. अशा प्रकारच्या सूचना येत आहेत.
Microsoft Windows Crash info in Marathi- ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (BSOD)
CrowdStrike
या अडचणीमुळे जगभरातील युजर्सचे संगणक आणि लॅपटॉप प्रभावित झाले असून, क्राउड स्ट्राइक यांनी या अडचणीची दखल घेत या समस्येची चौकशी सुरू केली आहे. तसेच क्राउड स्ट्राइक च्या प्रतिनिधींनी एक विधान जारी केले की विंडोज वर चालणाऱ्या मशीन्स वर ब्लू स्क्रीन ऑफ डेथ समस्या निर्माण झाली आहे.
तुम्हाला अशा प्रकारची समस्या येत असेल, तर स्वतःहून या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू नका तांत्रिक सूचना येईपर्यंत वाट पहा. क्राउड स्ट्राइक या समस्येवर काम करत आहे. शुक्रवारी सकाळीच क्लाऊड सेवा विस्कळीत झाल्याने जगभरातील अनेक भागात विविध समस्या निर्माण करणे अनेक विमान कंपन्यांच्या उड्डानावर परिणाम झाला असून भारत अमेरिकेसह अनेक देशातील विमानसेवा विस्कळीत झाली आहे.
अनेक युजर्सनी ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (BSOD) बाबत तक्रार देखील केली आहे, या समस्येमुळे जगभरातील लाखो युजर्सवर याचा परिणाम झाला, त्यामुळे तर त्यांची स्क्रीन बंद होत आहे किंवा ब्लू स्क्रीन ची समस्या येत आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या, जीमेल, ॲमेझॉन आणि इतर आपत्कालीन सेवांवर झाला आहे.
Microsoft Windows Crash info in Marathi असेच टेक अपडेट मिळवण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा तसेच सदर लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.