डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण देशभरातून अनुयायी दादर चैत्यभूमी येथे येत असतात त्यांची गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेऊन सगळ्या यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करावे असे निर्देश मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर
Local holiday declared in mumbai महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर करण्याचे निर्देशही यंत्रणांना दिले.
अनुयायांची गैरसोय होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. अनुयायांची संख्या दरवर्षी वाढत असल्याने त्यांना भोजन, स्वच्छ व पुरेशी स्वच्छतागृह, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, राहण्यासाठी व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, ठिकठिकाणी समन्वय कक्ष आणि सुरक्षा व्यवस्था उत्तम रित्या पार पडण्याचे यंत्रणांना निर्देश देण्यात आले. येथील संपूर्ण परिसरात स्वच्छता आणि रेल्वे स्थानकांवर देखील मदत कक्ष उभारण्यात यावे असे निर्देश माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिले.
सदर बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी बैठक व्यवस्था, भोजन, आरोग्य, पाणी, स्वच्छता आणि सुरक्षा सुविधा दर्जेदार देण्यात याव्यात असे प्रतिपादन केले.
तसेच महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर येथे येणाऱ्या अनुयायांच्या सोयी सुविधांच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे घेतला.