Mishti Doi with Jaggery recipe in Marathi : मिष्टी दोई हा एक पारंपारिक बंगाली गोड मिठाई आहे. हा पदार्थ पश्चिम बंगालमध्ये खूप प्रसिद्ध आहे. मिष्टी दोई म्हणजे गोड दही होय. जो साखर किंवा गुळ घालून तयार केला जातो. या पाककृती मध्ये साध्या दह्याला गोड स्वाद देऊन त्याला सण-उत्सवांसाठी विशेष बनवले जाते. या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची साधी तयारी आणि स्वादिष्टता, जी कोणालाही आवडेल. चला तर मग जाणून घेऊया मिष्टी दोई कशी बनवायची.
साहित्य Mishti Doi with Jaggery recipe in Marathi
- १ लिटर पूर्ण फॅट असलेले दूध
- १ कप साखर (गुळ देखील वापरू शकता)
- १/२ कप ग्रीक योगर्ट किंवा साधा दही (starter म्हणून वापरण्यासाठी)
- २ ते ३ टेबलस्पून पाणी
- सजावटीसाठी काजू, बदाम, पिस्ते (ऐच्छिक)
कृती
१) सर्वप्रथम, एका जाड तळाच्या भांड्यात १ लिटर दूध घ्या आणि मध्यम आचेवर उकळायला ठेवा. ते भांड्याच्या तळाला लागू नये म्हणून सतत ढवळत राहा.
२) दूध जवळपास अर्धे होईपर्यंत उकळून घ्या म्हणजे ते घट्ट होईल.
३) एका छोट्या भांड्यामध्ये १ कप किसलेला गुळ किवा गुल पावडर घ्या आणि २ ते ३ टेबल स्पून पाणी घाला.
४) गुळ हळूहळू वितळवा आणि गडद तपकिरी रंगाचे होईपर्यंत उकळवा.
५) पातळ झाल्यावर, ते थोडे थंड होऊ द्या आणि तयार केलेल्या घट्ट दुधात ओता.
६) कॅरामल युक्त दूध चांगले ढवळून घ्या, जेणेकरून गुळ दूधात पूर्णपणे मिक्स होईल.
७) दूध हळूहळू थंड होऊ द्या आणि थोडेसे गरम असताना त्यात ग्रीक योगर्ट किंवा साधे दही घाला.
८) दही घालून दूध चांगले मिसळून एकजीव करून घ्या.
९) हे तयार झालेले मिश्रण मातीच्या भांड्यामध्ये ओतून घ्या. मातीच्या पेल्यांमध्ये दही जास्त चांगले जमतं आणि त्याला नैसर्गिक चव येते. तुम्ही काचेचे अथवा स्टील चे भांडे वापरू शकता.
१०) भांड्यावर झाकण ठेवून ६-८ तासांसाठी किंवा संपूर्ण रात्रीसाठी थंड जागी ठेऊन द्या. मिश्रण चांगले सेट होईल आणि घट्ट मिष्टी दोई तयार होईल.
मिष्टी दोई सेट झाल्यानंतर, त्यावर ड्राय फ्रुट – काजू, बदाम, मनुके, पिस्ता इ. घालून सजवा. थंडगार चविष्ठ मिष्टी दोई खाण्यासाठी तयार आहे. हे गोड पदार्थ सणासुदीच्या वेळेस अथवा खास प्रसंगी सर्व्ह करायला उत्तम आहे.
Creamy Pasta Recipe in Marathi
Bengali Mithai Mishti Doi टीप्स
Mishti Doi recipe in Marathi साठी काही महत्वाच्या टिप्स पुढील प्रमाणे –
- मिष्टी दोई साठी संपूर्ण फॅट असलेले दूध वापरणे.
- तुम्हाला गोडसर चव थोडी कमी हवी असल्यास साखरेचे प्रमाण कमी करू शकता किंवा गुळाचा वापर करू शकता.
- दही सेट होण्यासाठी ६ ते ८ तास लागतात. त्यामुळे एक दिवस आधी तयारी करणे उत्तम.
Bengali Mithai Mishti Doi फक्त स्वादिष्टच नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही लाभ दायक आहे. दह्यामुळे पाचनक्रिया सुधारते आणि शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात. तसेच, पाककृती घरी बनवल्यामुळे तुम्ही त्यातील साखरेचे / गुळाचे प्रमाण नियंत्रित करू शकता.
मिष्टी दोई हा एक असा बंगाली गोड पदार्थ आहे, जो आपल्या मराठी घराघरात देखील प्रसिद्ध होऊ लागला आहे. या रेसिपी मुळे तुम्ही देखील घरी हा स्वादिष्ट पदार्थ तयार करू शकता आणि आपल्या कुटुंबियांसोबत त्याचा आनंद घेऊ शकता. मिष्टी दोई ची साधी आणि जलद तयारी, त्याचा मोहक स्वाद आणि आरोग्यदायी फायदे यामुळे हा पदार्थ तुमच्या मेजवानीचा अविभाज्य भाग होईल.
अशाच झटपट तयार होणाऱ्या रेसीपीचे अपडेट जाणून घेण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा. तसेच मिष्टी दोई हि रेसिपी कशी वाटली हे कॅमेंत करून जरूर कळवा.
हे देखील वाचा