Dhutpapeshwar Temple Rajapur : ऐतिहासिक वारसा लाभलेल राजापूर… डोंगराच्या कुशीत वसलेले एक सुंदर शहर, अनेक रहस्य आणि विलोभनीय ठिकाणं आपल्या कवेत घेऊन मनसोक्त निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे सुन्दर गाव…. नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असा हा परिसर येथे फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. राजापूरची गंगा, गरम पाण्याचा झरा, रानतळे, विजयदुर्ग किल्ला, पांगरे कातळ शिल्प, Dhutpapeshwar Temple Rajapur, धबधबे, प्राचीन मंदिरं आणि बरच काही येथील खाद्य संस्कृती देखील प्रसिद्ध आहे.
Dhutpapeshwar Temple Rajapur
Dhutpapeshwar Temple Rajapur नदीकिनारी वसलेले हे शहर खाडी आणि नदी यांच्या संगमामुळे पावसाळ्यात बऱ्याचदा पाण्याखाली जाते. राजापूरचे वैशिष्ट्य म्हणजे येथे दर तीन वर्षांनी अवतरणारी गंगामाई पूर्वी काही काळ नियमित तीन वर्षानी येणारी गंगामाई अलीकडे अनिश्चित काळात बऱ्याचदा येऊन जाते. गंगा, उन्हाळे अशी बरीच ठिकाणे येथे पाहण्यासारखी आहेत. या प्रसिद्ध ठिकाणांच्या येथे शास्त्रीय अभ्यासक देखील येऊन गेले आहेत पण या ठिकाणांचे गुढ मात्र त्यांना शोधता आले नाही. या लेखांमध्ये आपण धुतपापेश्वर या प्राचीन शिव मंदिराविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊ.
Dhutpapeshwar Temple Rajapur जवाहर चौकातून उजवीकडे धुतपापेश्वरला जाण्यासाठी एक मार्ग आहे. साधारण चार- पाच किलोमीटर आत गेल्यावर आपणास प्राचीन धूतपापेश्वरचे भव्य लाकडी मंदिर नजरेस पडते. हा तीन ते चार किलोमीटरचा रस्ता अतिशय अरुंद असून नेहमी वर्दळीचा असतो.
मंदिराचा आजूबाजूचा परिसर हा नारळ, सुपाऱ्या यांच्या बागांनी आणि बाजूलाच वाहणाऱ्या नदीच्या खळखळाटाणे गजबजलेला असतो. पावसाळ्यात येथील निसर्ग पाहण्यासारखा असतो सगळीकडे हिरवळ, या परिसरातून पुढे गेल्यास आपणास भगवान शंकराचे प्राचीन मंदिर नजरेस पडते मंदिर पाहूनच मंदिराची प्राचीनता दिसून येते. अलीकडच्या काळात मंदिराचा जिर्णोद्धार केला असून आतील गर्भगृह प्राचीन आहे. भला मोठा डोंगर डोंगराच्या बाजूने वाहणारी नदी आणि हे मंदिर, मंदिराचा प्रशस्त परिसर आणि येथील रचना आकर्षक असून पाहण्यासारखी आहे. मंदिराच्या बाजूस वाहणारे मृदानी नदीचे पात्र या पात्रातील धबधबे जुलै ते नोव्हेंबर काळात वेगाने वाहत असतात.
मंदिराचे बांधकाम हे लाकडांमध्ये तसेच काळ्या पाषाणांचे केलेले आहे. लाकडी मंडप व पुढे दगडी बांधकाम असलेले काळ्या पाषाणाचे गर्भगृह अतिशय विलोभनीय आहे. या शिवलिंगा बाबत येथील पुजारी यांच्याकडून आख्यायिका देखील सांगितली जाते. सदर शिवलिंग हे स्वयंभू असून जागृत आहे.
सोमवारी येथे भक्तगणांची वर्दळ नेहमीच बघायला मिळते श्रावणात देखील श्रावण सोमवार शनिवार हा परिसर गर्दीने गजबजलेला असतो. धूतपापेश्वर मंदिर हे धोपेश्वर गावातील जागृत देवस्थान आहे. सर्व पापे धुऊन काढणारा धूतपापेश्वर जाणून घेऊया या मंदिराची संपूर्ण माहिती.
मुंबईपासून साधारण 450 किलोमीटरवर राजापूर शहर आहे. राजापूर शहरापासून साधारण पाच किलोमीटर अंतरावर धोपेश्वर हे गाव आहे या गावांमध्ये आहे हे प्राचीन शिवमंदिर धूतपापेश्वर.
Dhutpapeshwar Temple Rajapur स्थापत्य
Dhutpapeshwar Temple Rajapur मंदिराचे बांधकाम हे पुरातन असून मंदिराच्या गर्भ गृहापुढे मोठा असा लाकडी सभामंडप आहे सभामंडपाचे छत हे कौलरू येथील छताला असलेली पताकांची सजावट ही पाहण्यासारखी असते सभा मंडपाच्या खांबांवर असलेले नक्षीकाम त्यावरील विविध नक्षी मारुती कमळ मासे मोरपीस असे लाकडे खांबांचे वैशिष्ट्य आहे मंदिराच्या सभोवतालच परिसर हा अतिशय निसर्गरम्य असून मनाला शांत आणि प्रसन्न करणारा आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या भल्यामठ्या खासदार आणि चोपदार यांच्या लाकडी मुर्त्या लक्ष वेधून घेतात मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगारखाना दीपमाळ यादेखील पाहण्यासारखे आहेत.
मंदिराच्या बाजूला असणारी मृदानी नदीचे पात्र आणि पात्रामध्ये असणारे सुंदर धबधबे येथील येथील सौंदर्यत फार घालतात धबधब्याजवळ एक प्रचंड डोह त्याला कोटी तीर्थ असे म्हणतात. प्रवाह जिथे पडतो तेथे असंख्य शिवलिंग पाहायला मिळतात. या परिसरात भगवान शंकराला प्रिय असे कैलास चाफ्याचे झाड येथे पाहायला मिळते.
या धूतपापेश्वर मुख्य मंदिराच्या पाठीमागे संपूर्ण काळा पाषाणात कामेश्वराचे सुंदर मंदिर आहे. धूतपापेश्वर मंदिरामध्ये गणेश मूर्ती आणि त्यासमोरच नवग्रह मूर्ती आहे. तसेच मृदानी नदीच्या पात्रापलीकडे सुंदर दत्तात्रय मंदिर आहे तसेच वीरभद्र देवाचे मंदिर देखील आहे.
धूतपापेश्वर मंदिरामध्ये रात्री महापूजा झाल्यानंतर शंकर पार्वती यांच्यासाठी सोंगट्यांचा सारीपाटाचा खेळ मांडला जातो आणि गर्भगृहाचा दरवाजा बंद केला जातो, दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा आरतीसाठी दरवाजा उघडला जातो तेव्हा या सगळ्या सोमट्या विखुरलेल्या आढळतात. पण असे नेहमी होत नाही येथील भाविकांची श्रद्धा आहे की भगवान शंकर आणि पार्वती येथे येऊन सारीपाठ खेळून जातात.
हे मंदिर प्राचीन असून पेशवे काळातील सरदार बिनीवाले यांनी भगवान शंकराच्या पिंडीवर सोन्याचा मुकुट भेट दिला होता जो आजही पूजेमध्ये वापरला जातो.
हे देखील वाचा – बांबू लागवड पर्यावरणपूरक शेतीतून मोठा नफा कसा मिळवावा.
Dhutpapeshwar Temple Rajapur पुजाऱ्यामार्फत सांगितली जाणारी दंतकथा
Dhutpapeshwar Temple Rajapur राजापुरात निळोबा भट नावचे एक सद्गुरुस्त राहत होते परिस्थितीने गरीब असूनही जे मिळेल त्यामध्ये ते समाधान होते काशी विश्वेश्वर दर्शन आणि गंगास्नान करण्यासाठी हे दरवर्षी काशिला जात असतात पण कालांतराने वयोमानामुळे काशीला जाणे शक्य नव्हते. शिवभक्त असल्यामुळे त्यांना शिव दर्शनाची ओढ लागलेली होती. अशातच अचानक त्यांच्या घरी असलेल्या गाईने दूध देण्याचे बंद केले. त्यांना संशय होता की गुराखी परस्पर दूध काढत असेल. त्यामुळे गुराख्याला बडबड करून त्यांनी गाईवर लक्ष ठेवण्यास सांगितले एकदा गुराख्याने गाईला एका झाडाखाली आपला पान्हा सोडताना पाहिले. हे पाहून त्याला राग आला व रागावलेल्या गुराख्याने त्या झाडाखालच्या खडकावर कुराडीचा घाव घातला त्याबरोबर त्या खडकाचा एक लहान तुकडा उडून कासर्डे या गावी पडला आणि त्याचे कपालेश्वर लिंग झाले. गुराख्याने ही घटना निळोबा भटांना सांगितली निळोबा भटांना त्या खडकात तुटलेले शिवलिंग दिसले ते पाहून त्यांना खूप वाईट वाटले. आजही ते स्वयंभू शिवलिंग तुटलेल्या अवस्थेत आहे. तुटलेला खडक पाहून गाईन देखील बाजूच्या डोहात उडी घेतली आणि पाठोपाठ निळोबा भटानीही प्रायशक्त म्हणून कोटी तीर्थामध्ये देह विसर्जन केले अशी ही कथा सांगितली जाते.
हे देखील वाचा – एक विलोभनीय पर्यटन स्थळ जेथे निसर्ग आणि अध्यात्माचे एकत्र दर्शन होते.
असेच कोकणातील पर्यटन स्थळांचे अपडेट मिळवण्यासाठी कोकण कल्चर ला फॉलो करा.