Ather Rizta info in Marathi

Ather Rizta info in Marathi : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असून, अनेक ग्राहक आता पेट्रोल वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक स्कूटर्सला प्राधान्य देत आहेत. Ather Energy एक नामांकित भारतीय कंपनी, जे इलेक्ट्रिक स्कूटर्स बनवतात, त्यांची ॲथर ४५० एक्स आणि ४५० एस या दोन इलेक्ट्रिक स्कूटर ची विक्री करते. त्यांनी ‘Ather Rizta’ ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लाँच केली आहे. या स्कूटरने अल्पावधीतच भारतीय ग्राहकांचे लक्ष वेधले आहे चला तर मग, Ather Rizta Marathi info सविस्तर जाणून घेऊया. ॲथर एनर्जी ने आपल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करून अगोदरच इव्ही मार्केट मध्ये आपले स्थान पक्के केले आहे. आधुनिक स्पोर्टी डिजाइन आणि चांगला परफॉर्मन्स सोबत चांगली रेंज यामुळे कमी वेळात खूप प्रसिद्ध झाली.

Ather Rizta info in Marathi
Ather Rizta info in Marathi

Ather Rizta info in Marathi

भारतीय बाजारात आता असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर पैकी प्रीमियम आणि चांगल्या रेंज देणाऱ्या स्कूटर मध्ये ॲथर चा नंबर वर लागतो.

Ather Rizta Price किंमत

Ather Rizta ही एक प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर असून तिची किंमत अंदाजे ₹१.३ लाख ते १.६ लाख (एक्स-शोरूम) इतकी आहे. विविध शहरांमध्ये या स्कूटरच्या किंमतीत फरक असू शकतो. तसेच, सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीमुळे ही किंमत आणखी कमी होऊ शकते. या स्कुटरची किंमत इतर इलेक्ट्रिक स्कूटर च्या तुलनेने जास्त आहे, फीचर्स आणि चांगली रेंज यामुळे ॲथर च्या स्कूटर लोकांच्या पसंतीस येत आहेत.

Ather Rizta info in Marathi स्पेसिफिकेशन्स (Specifications)

Ather Rizta मध्ये आधुनिक टेक्नॉलॉजी वापरलेली असून ती ५.४ किलो वॅट मोटरने सुसज्ज आहे. ही मोटर कमी वेळेत जास्त वेग देण्यास सक्षम असुन हेवी ड्युटी बॅटरीसह येते, ज्यामुळे या स्कूटरची रेंज चांगली मिळते.

मोटर पॉवर ५.४ kW

बॅटरी क्षमता ३.७ kWh

रेंज एका चार्जमध्ये १२०-१३० किमी

टॉप स्पीड ८० किमी प्रति तास

चार्जिंग वेळ ० ते ८० % चार्जिंगला ३.५ तास, पूर्ण चार्जिंगला ५ तास

ब्रेक ड्युअल डिस्क ब्रेकसह

फीचर्स (Features)

Ather Rizta मध्ये असे अनेक आकर्षक फीचर्स आहेत जे ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरतात. यात स्मार्ट टेक्नॉलॉजीपासून स्मार्ट कनेक्टिव्हिटीपर्यंत सर्वकाही मिळते.

डिजिटल डिस्प्ले – हाय-रेजोल्यूशन ७-इंच टचस्क्रीन डिस्प्ले जो नेव्हिगेशन, कॉल अलर्ट, आणि नोटिफिकेशन्स सह सुसज्ज आहे.

स्मार्ट कनेक्टिव्हिटी – ॲथर ॲपच्या माध्यमातून बॅटरी स्टेटस, चार्जिंग स्टेटस आणि व्हेईकल लोकेशन याबद्दलची विस्तृत माहिती मिळते.

मोड्स – इको, राइड, आणि स्पोर्ट्स असे तीन मोड्स आहेत जे तुम्हाला वेगवेगळ्या स्थितीत वेग आणि रेंजच्या गरजेनुसार वापरता येतात.

रिव्हर्स असिस्ट -पार्किंगच्या वेळी किंवा अरुंद जागांमध्ये स्कूटर मागे घेण्यासाठी ही सुविधा उपयुक्त आहे. विशेषतः महिलांसाठी आणि प्रौढ व्यक्तींसाठी हे एक आवश्यक फीचर्स देण्यात आले आहे.

ऑटो अपडेट्स: ओवर-द-एअर अपडेट्सद्वारे नवीन सॉफ्टवेअर अपडेट्स उपलब्ध होतात.

डिझाइन (Design)

Ather Rizta स्कूटरचे डिझाइन आकर्षक असून आधुनिक आणि अर्बन जीवनशैलीला योग्य आहे. या स्कूटरचा लूक मॉडर्न, शार्प आणि स्टायलिश आहे. स्कूटरमध्ये एक मजबूत, ट्यूबलर फ्रेमचा वापर केला आहे, जो या स्कूटरला अधिक मजबूत आणि दीर्घकाळ टिकाऊ बनवतो. समोर LED हेडलाइट्स आणि आकर्षक DRLs दिले आहेत. स्कूटरच्या मागील बाजूस LED टेललाइट्स दिले आहेत,

सेफ्टी (Safety)

सेफ्टीच्या बाबतीत Ather Rizta इतर इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या तुलनेत एक पाऊल पुढे आहे. यात मिळणारे ड्युअल डिस्क ब्रेक्स आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम तुम्हाला अधिक सुरक्षित बनवतात.

एबीएस (ABS) – ब्रेक दाबल्यानंतर टायर लॉकिंग टाळण्यासाठी अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम असते, ज्यामुळे स्कूटर स्किड होण्याची शक्यता कमी होते. कुठे सुरक्षित रित्या थांबवण्यास मदत होते.

रिजनरेटिव्ह ब्रेकिंग – यामुळे ब्रेक लावताना ऊर्जा निर्माण होते आणि ती बॅटरीमध्ये स्टोअर केली जाते. मराठी ब्रेकिंग सिस्टीम मुळे बॅटरी ब्रेकिंगच्या वेळेस चार्ज होत राहते. याचा फायदा अधिक ड्रायव्हिंग रेंज मिळवण्यासाठी होतो.

ट्यूबलेस टायर्स – ट्यूबलेस टायर्समुळे टायर पंचर झाल्यास लगेच हवा कमी होत नाही, ज्यामुळे अचानक थांबण्याची गरज पडत नाही.

लो बॅटरी अलर्ट – बॅटरी चार्जिंग कमी झाल्यावर स्कूटर तुम्हाला अलर्ट करते, त्यामुळे तुम्ही वेळेत चार्जिंगसाठी नियोजन करू शकतात.

रिलायबिलिटी (Reliability)

Ather Rizta info in Marathi ॲथर कंपनीच्या पूर्वीच्या मॉडेल्सप्रमाणेच Ather Rizta हा एक विश्वासार्ह स्कूटर आहे. याची बॅटरी लाईफ चांगली असून कमी मेन्टेनन्स खर्च असल्यामुळे ही स्कूटर दीर्घकाळ टिकून राहू शकते. ॲथर स्कूटर्सना उत्कृष्ट ग्राहक सेवा दिली जाते, ज्यामुळे विक्रीनंतर देखील ग्राहक समाधानी राहतात.

हे देखील वाचा – Ather 450X info

Ather Rizta खरेदी का करावी?

Ather Rizta ही फॅमिली साठी एक उत्तम पर्याय असू शकते जर तुम्हाला कमी खर्चात चालणारी, आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि पर्यावरणपूरक स्कूटर हवी असेल. या स्कूटरमध्ये फास्ट चार्जिंग, डिजिटल फीचर्स, आणि उत्कृष्ट सेफ्टी सिस्टम आहे. त्याचबरोबर, इलेक्ट्रिक वाहन असल्यामुळे पेट्रोलवर होणारा खर्च वाचतो आणि कार्बन उत्सर्जन कमी होते.

Ather Rizta ही एक प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ज्यामध्ये स्टायलिश डिझाइन, आकर्षक फीचर्स आणि हाय परफॉर्मन्स मिळतो. कमी देखभाल आणि उत्कृष्ट रेंज यामुळे ही स्कूटर ग्राहकांना एक उत्तम अनुभव देते.

Ather Rizta info in Marathi असेच नव नवीन ऑटो अपडेट जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Vinesh Phogat ने जाहीर केली निवृत्ती Golden boy ने रौप्य पदक जिंकत रचला इतिहास Neeraj Chopra Won Silver Medal मराठमोळ्या Avinash Sable ने रचला इतिहास पण मेडल हुकले. Mumbai’s most famous street food Famous places for Monsoon Trip in India