Ather 450X info in Marathi

Ather 450X info in Marathi : बदलत्या काळानुसार आणि लोकांच्या गरजेनुसार तसेच पर्यावरण रक्षणासाठी लोक देखील इलेक्ट्रिक वाहनाना प्राधान्य देत आहेत. अशातच अनेक विदेशी तसेच भारतीय कंपन्या आपल्या ईव्ही भारतीय बाजारात लॉन्च करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने हिरो, रेवोल्ट, एथर, बजाज, ओला इ. कंपन्यांची ईलेक्ट्रिक वाहने भारतीय बाजारात आता आपले स्थान मजबूत करत आहेत. त्यातही अनेक कंपन्यांच्या अनेक दर्जेदार गाड्या रस्त्यावर धावताना दिसतात. Ather 450X हे त्यातीलच एक महत्त्वाचे नाव आहे. या लेखामध्ये Ather 450X बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. यात आम्ही या इलेक्ट्रिक स्कूटरच्या वैशिष्ट्यांपासून ते चार्जिंग वेळ, रेंज, फायदे आणि तोटे यांबद्दल संपूर्ण माहिती घेऊ.

Ather 450X info in Marath
Ather 450X info in Marath

Ather 450X info in the Marathi

एथर एनर्जी ही भारतीय इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी आपल्या स्मार्ट आणि ऍडव्हान्स स्कूटर्ससाठी ओळखली जाते. एथर एनर्जीच्या सध्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत आहेत त्यामध्ये एथर 450 X आणि एथर 450 S पैकी एथर 450X हा स्कूटर एक लोकप्रिय मॉडेल आहे. आधुनिक टेक्नॉलॉजी आणि आकर्षक डिजाइनमुळे हे वाहन आजच्या तरुणाई मध्ये विशेष प्रिय झाले आहे.

Ather 450X info in Marathi
Ather 450X info in Marathi

एथर 450X चे वैशिष्ट्ये (Specifications of Ather 450X)

एथर 450X मध्ये ६.४ kW ची पीक पॉवर देणारी PMSM मोटर आहे. या स्कूटरला २६ Nm टॉर्कची क्षमता आहे, ज्यामुळे वेग आणि स्मूथ राइडिंग अनुभव मिळतो.

बॅटरी क्षमता – यामध्ये ३.७ kW ची लिथियम आयन बॅटरी दिली आहे. ही बॅटरी IP आय पी ६७ वॉटर-रेसिस्टंट आहे, म्हणजेच पावसातही सुरक्षित राहते.

टॉप स्पीड – या स्कूटरचा टॉप स्पीड ९० किमी/तास आहे, जो हायवे आणि शहरी भागांसाठी योग्य आहे.

ॲडव्हान्स डिस्प्ले – एथर 450X मध्ये ७-इंचाची टचस्क्रीन डॅशबोर्ड डिस्प्ले आहे, ज्यामध्ये नेव्हिगेशन, चार्जिंग स्टेटस, म्युझिक प्ले, आ इतर स्मार्ट फीचर्स आहेत.

मल्टिपल राइडिंग मोड – एथर 450X मध्ये वेगवेगळे राइडिंग मोड्स आहेत: इको, राइड, स्पोर्ट, आणि स्मार्ट इको मोड. प्रत्येक मोडमध्ये स्कूटरचा परफॉर्मन्स आणि रेंज बदलते.

Ather 450X info in Marath

किंमत (Price of Ather 450X) Ather 450X info in Marathi

एथर 450X ची किंमत वेगवेगळ्या शहरांमध्ये किंचित बदलू शकते. साधारणपणे ही स्कूटर १.५ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. सबसिडी नुसार किंमत कमी होऊ शकते, कारण राज्य सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या अनुदानाच्या योजना राबवीत आहेत.

चार्जिंग आणि रेंज (Charging Time & Range of Ather 450X)

नॉर्मल चार्जिंगवर एथर 450X ला ०-१०० % चार्ज होण्यासाठी ५ ते ६ तास लागतात. तसेच फास्ट चार्जिंग स्टेशनवर हे वाहन १ तासात ८०% पर्यंत चार्ज होते.

Ather 450X इको मोडवर १०५-११० किमी पर्यंतची रेंज देते, तर स्पोर्ट्स मोडवर ही रेंज कमी होऊन ८५ किमी पर्यंत येते. शहरी भागात हा इको मोड विशेष फायदेशीर ठरतो, कारण कमी वेगात अधिक रेंज मिळवता येते.

एथर 450X चे फायदे (Advantages of Ather 450X)

इलेक्ट्रिक असल्यामुळे या वाहनाचा पर्यावरणावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. एथर 450X वापरल्यास आपण कार्बन उत्सर्जन टाळून पर्यावरण ह्रास टाळता येतो.

या स्कूटरमधील विविध राइडिंग मोड्स आणि मजबूत मोटरमुळे चालवताना चांगला अनुभव मिळतो.

टचस्क्रीन डिस्प्ले, स्मार्ट कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन, आणि इतर फीचर्समुळे ही स्कूटर टेक्नोसॅव्ही लोकांसाठी योग्य आहे.

पेट्रोल स्कूटर्सच्या तुलनेत इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये कमीत कमी देखभाल खर्च असतो. त्यामुळे दीर्घकाळाच्या वापरासाठी ही किफायतशीर ठरते.

हे देखील वाचा – New Suzuki Dzire 2024

एथर 450X चे तोटे (Disadvantages of Ather 450X)

अनेक ठिकाणी अद्याप फास्ट चार्जिंग स्टेशन उपलब्ध नाहीत, ज्यामुळे चार्जिंगची अडचण येऊ शकते.

इतर इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या तुलनेत एथर 450X ची किंमत जास्त आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांसाठी ते खरेदी करणे थोडे आव्हानात्मक ठरू शकते.

लांब प्रवासासाठी ही स्कूटर कमी रेंजमुळे तितकीशी उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे सध्याच्या स्थितीत शहरात वापरासाठीच हे योग्य आहे.

एथर 450X का खरेदी करावे?

पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक वाहन हवे असल्यास ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि स्मार्ट फीचर्सची आवड असणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. कमी मेंटेनन्स आणि शहरातील दैनंदिन प्रवासासाठी योग्य आहे.

Ather 450X ही एक ऍडव्हान्स, स्मार्ट आणि पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक स्कूटर आहे. जर तुमचे बजेट आणि गरजा यासाठी अनुकूल असतील तर ही स्कूटर खरेदी करणे एक चांगला पर्याय ठरू शकतो.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

असेच नाव नवीन ऑटो अपडेट जाणून घेण्यासाठी वाचत राहा कोकण कल्चर

हे देखील वाचा – konkanved

Tata Sierra EV सिंगल चार्ज मध्ये धावणार 590 किमी

1 thought on “Ather 450X info in Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Vinesh Phogat ने जाहीर केली निवृत्ती Golden boy ने रौप्य पदक जिंकत रचला इतिहास Neeraj Chopra Won Silver Medal मराठमोळ्या Avinash Sable ने रचला इतिहास पण मेडल हुकले. Mumbai’s most famous street food Famous places for Monsoon Trip in India