Skoda Kylaq launch : स्कोडा ही भारतात आपल्या प्रीमियम कार्स साठी ओळखली जाते. स्कोडा कंपनीच्या गाड्या या महागड्या आणि प्रीमियम सेगमेंट मध्ये येतात. पण आता स्कोडा ने भारतात मिड सेगमेंट एसयूव्ही परवडणाऱ्या किमतीत लॉन्च करून भारतीय बाजारपेठेत इतर कंपन्यांना नवीन आव्हान दिले आहे.
स्कोडा कंपनीने भारतात Skoda Kylaq चे बुकिंग २ डिसेंबर पासून सुरू केले असून याची डिलिव्हरी २७ जानेवारी २०२५ पासून सुरू करणार आहे. या एस यु व्ही ची किंमत ही सर्वसामान्यांना परवडणारी अशी ७.८९ लाखापासून सुरू होते. चला तर जाणून घेऊया Skoda Kylaq संपूर्ण माहिती.
Skoda Kylaq launch
भारतात सध्या ४ मीटर पेक्षा लहान एसयूव्ही अधिक विक्री होत असल्याने अनेक कंपन्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च करत आहेत, स्कोडा देखील आतापर्यंत मिडीयम साईज एसयूव्ही मध्ये सक्रिय होती. आणि आता ४ मीटर पेक्षा लहान Skoda Kylaq स्कोडा ने लॉन्च केलेली कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. याची सुरुवातीची किंमत ही ७.८९ लाख रुपये एक शोरूम इतकी असून. ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही दमदार लूकसह पॉवरफुल इंजिन ने सुसज्ज आहे. या एसयूव्हीची स्पर्धा ही TATA Nexon, Maruti Suzuki Brezza, Hyundai Venue यांच्याशी असेल.
हे देखील वाचा – सुजुकी डिजायर झाली नव्या रूपात लॉन्च जाणून घ्या संपूर्ण माहिती
Skoda Kylaq चा लुक हा स्कोडा कुशक सारखा असून आत मध्ये प्रीमियम डॅशबोर्ड, क्लायमेट कंट्रोल पॅनल, ८ आठ इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि १० इंच इन्फोटेनमेंट सिस्टीम ऑफर करण्यात आली आहे. स्कोडा कायलॅक मध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सनरूफ, कि लेस इंट्री, अँड्रॉइड ऑटो, एप्पल कार प्ले, व्हेंटिलेशन सीटसह वायरलेस चार्जर, पॉवर सीट अडजस्टमेंट असे अनेक फीचर्स यामध्ये ऑफर करण्यात आले आहेत.
स्कोडा कायलॅक ची क्रॅश टेस्ट झाली नसल्याने सेफ्टी रेटिंग कळू शकले नाही. पण एकंदर पाहता स्कोडाची बिल्ड क्वालिटी फिट अँड फिनिश अतिशय उत्तम असून ही गाडी AO IN प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे. यामध्ये स्टॅंडर्ड सहा एअर बॅग, ईबीडी एबीएस, स्टॅबिलिटी कंट्रोल, चाइल्ड सीट माउंट इत्यादींचा समावेश आहे. स्कोडाने दावा केल्याप्रमाणे १० सेकंदात ०-१०० किमी प्रति तास वेग धारण करते, त्यामुळे ही कार कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंट मधील वेगवान कार बनते.
स्कोडा १.० लिटर टीएसआय पेट्रोल इंजिन ऑफर करते जे ८५ बीएचपी पावर आणि १७८ टॉर्क जनरेट करते, हे इंजिन ६ स्पीड मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑफर करते.
जर तुम्ही बजेट मध्ये नवीन प्रीमियम कार शोधत असाल तर Skoda Kylaq तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
हे देखील वाचा – सिंगल चार्ज मध्ये धावणार ५९० किमी