Saurabh Netravalkar पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणारा भारतीय वंशाचा क्रिकेटर.

पाकिस्तानविरुद्ध सामन्यात यूएसएच्या विजयाचा शिल्पकार भारतीय वंशाचा क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकर हा ठरला. 

T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध यूएसए संघाने शानदार विजय मिळवत इतिहास रचलाय. 

भारताच्या २०१० मध्ये झालेल्या १९ वर्षाखालील वर्ल्डकप संघात सौरभ केएल राहुल, हर्षल पटेलसारख्या खेळाडूंसह खेळला होता.  

शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेला सौरभ आता थेट अमेरिकेच्या क्रिकेट संघाचा हुकुमी एक्का ठरला आहे.  

याच उत्सुकतेमध्ये काहींनी सौरभच्या लिंक्डइन प्रोफाइलचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केले आणि मग मॅच पेक्षा याच पोस्ट तुफान व्हायरल होऊ लागल्या. 

जन्मभूमी विरुद्ध  कर्मभूमी ही लढत देणाऱ्या सौरभच्या जोरावर काल पाकिस्तान पराभूत झाल्याने आता सोशल मीडियावर तो हिरो ठरला आहे. 

३२ वर्षीय सौरभने गुरुवारी सुपर-ओव्हरमध्ये आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये पाकिस्तानच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. 

सौरभ नेत्रावळकर हा मुळचा मुंबईचा असून तो इंजीनियर आहे. मुंबई विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकी पदवी प्राप्त करून.

सौरभ कॉर्नेल विद्यापीठातून संगणक विज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी अमेरिकेत गेला होता.