सध्या भारतीय वाहन बाजारात इलेक्ट्रिक कार्सच्या सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सचा दबदबा आहे.
या कारची सुरुवातीची किंमत १४.९९ लाख रुपये इतकी आहे.
क्रूझ कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी यांसारख्या नवीन फीचर्ससह हे नवीन मॉडेल लॉन्च करण्यात आलं आहे.
सध्या ज्या ग्राहकांकडे नेक्सॉन ईव्ही कार आहे अशा तब्बल २२ हजार ग्राहकांना कंपनी मोफत सॉफ्टवेअर अपडेट्स देऊन जुनी कार नेक्सॉन प्राईमसारखी करण्याची सुविधा देखील देत आहे.
कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरवर ग्राहक आपली कार नेऊन अपडेट करून घेऊ शकतात.
खरेदी करू इच्छिणाऱ्यांची नेक्सॉन ही नॅचरल चॉईस बनली आहे