Colonel Sanders यांनी वयाच्या ६2 व्या वर्षी व्यवसाय सुरु करून यशस्वी केला.

घरच्या परीस्थिती मुळे Colonel Sanders वयाच्या ७ व्या वर्षी स्वयंपाक करायला शिकले.

काही वर्ष त्यांनी उपजीविके साठी टायर विकणे, फेरी बोट चालवणे, सेल्समन, ड्रायवर अशी अनेक कामे केली. 

४० व्या वर्षी त्यांना kentucky येथील कोर्बिन येथे कुकिंग च्या कामाची संधी मिळाली.त्यांचे पदार्थ लोकांमध्ये प्रसिद्ध होऊ लागले.

संँडर्स हे चिकन च्या परफेक्ट रेसीपीसाठी अनेक वर्ष प्रयत्न करत होते, शेवटी १९३९मध्ये त्याच्या फेमस चिकन ची रेसिपी शोधली.

पुढे संँडर्स हे चिकन घरोघरी फिरून चिकन ची  माहिती द्यायचे, बनवून दाखवायचे, पण हजारो वेळा अपयश येऊन देखील संँडर्सनी प्रयत्न सोडले नाही.

पुढे संँडर्स यांना सकारात्मक प्रतीसाद मिळाला, त्यांनी त्यांच्या या चिकन ला Kentukey Fried Chicken असे नाव दिले. इथून पुढे त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

पुढे त्यांना जगातील सर्वोत्तम Chicken बनवणारे अशी ओळख मिळाली, पैसा तर मिळालाच परंतु त्यांनी दाखवून दिले कि प्रयत्न केले तर यश मिळतेच.