सध्या बाजारात मोटरोला, सॅमसंग अशा अनेक कंपन्या आपले फोल्डेबल फोन मार्केटमध्ये लॉन्च करत आहे. सॅमसंग या बाबतीत सगळ्यात वरचढ आहे. 

सॅमसंग पाठोपाठ इतरही कंपन्या आपला फोल्डेबल फोन लॉन्च करत आहेत. या स्पर्धेमध्ये आता ॲपल कंपनी देखील उतरली आहे. 

रिपोर्टनुसार ॲपल सॅमसंगला टक्कर देण्यासाठी आपला फोल्डेबल फोन लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉंच करू शकते. 

यामुळे भारतीय बाजारपेठेत सर्वांना आता ॲपलच्या फोल्डेबल फोनची प्रतीक्षा आहे. 

रिपोर्टनुसार ॲपल 2018 पासून फोल्डेबल प्रोटोटाईप वर काम करत आहे, आणि ॲपल नेहमीच मार्केटमध्ये नवीन काहीतरी भन्नाट घेऊन येत असते. 

या आगामी फोल्डेबल फोन मध्ये सॉफ्टवेअरच्या बाबतीत iOS नवीन आवृत्ती आणू शकते. 

फोल्डेबल फोन मध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट मिळण्याची शक्यता आहे यासोबतच टच आयडी आणि फेस लॉक देखील मिळेल 

ॲपल डिस्प्ले साठी सिल्वर नॅनो वायर टच सोल्युशन चा वापर करू शकते. तसेच या फोनच्या किमती बाबतही ॲपल कडून अधिकृत कोणतेही अपडेट आलेले नाहीत. 

असे म्हटले जात आहे की या फोल्डेबल आयफोन चे लॉन्चिंग ही 2026 च्या आसपास होऊ शकते.