इटलीची प्रसिद्ध कार कंपनी फरारी आपली एसयूव्ही सुपर कार Purosangue ही भारतात लवकरच लॉन्च करणार आहे.
प्रथम बुकिंग केलेल्या ग्राहकांच्या डिलिव्हरी नंतर, पुन्हा बुकिंग चालू केली जाईल. भारतात तिची प्रत्यक्ष विक्री ही सप्टेंबर 2024 च्या आसपास अपेक्षित आहे.
पूरोसांग्यू ही फरारी लाईनअप मधील पहिली एसयूव्ही आहे. Ferrari Purosangue ही फरारी रोमा कुप प्लॅटफॉर्मवर डेव्हलप केलेली आहे.
पूरोसांग्यू ची किंमत ही 10.5 कोटी रुपये असून ही किंमत भविष्यात वाढण्याची शक्यता आहे
अगोदर बुक केलेल्या ग्राहकांच्या ऑर्डर्स पूर्ण झाल्यानंतर इतरांसाठी बुकिंग पुन्हा चालूकरण्यात येईल.
Ferrari Purosangue ही फरारीच्या इतिहासातली पहिली चार दरवाजे असलेली कार आहे.
Ferrari Purosangue ही 75 वर्षानंतर फरारीने ही अनोखी कार लॉन्च केली आहे.
याकारची स्पर्धा ही थेट रोल्स रॉइस कलीनन, लेम्बोर्गिनी उरूस, पोर्श केयेन टर्बो, बेंटले बेंटायगा, एस्टन मार्टिन डीबीएक्स, रेंज रोवर स्पोर्ट यांसारख्या हाय परफॉर्मन्स कार सोबत असेल.
या कारमध्ये नॅचरली अस्पिरेटेड गॅसोलीन 6.5 लिटर V 12, 6496 cc पेट्रोल इंजिन, जे आठ स्पीड डीसीटी ट्रान्समिशनसह येते.
स्पोर्टीनेस आणि पाॅवर मुळे Ferrari Purosangue ही 0 ते 100 किमी स्पीड 3.3 सेकंदात गाठते.