भूगर्भातील हालचालींमुळे उलथापालथ होत असते. पृथ्वीच्या आतील थरएकमेकांवर आदळतात आणि त्यामुळे भूकंप होतो.
जगभरातील भूकंप मापन केंद्र दरवर्षी भूकंपाचे साधारण 20 हजार झटके नोंदवतात.
दरवर्षी भूकंपाचे लाखो झटके बसतात. यातले बहुतेक इतके सौम्य असतात की ते रेकॉर्ड करणं शक्य नसतं
माणसाच्या कृत्यांमुळे भूकंप होतात असं नव्यानं समोर आलं आहे.
तेल काढण्यासाठी अनेक किलोमीटर्सपर्यंतचं खोदकाम केलं जातं. तेल शोधण्यासाठी दरवर्षी 10 हजारांपेक्षा जास्त विहिरी खोदल्या जातात. यासाठी 'जिओथर्मल एनर्जी'चा वापर केला जातो.
2050 पर्यंतअशा प्रकारचं खोदकाम सहा पटींनी वाढण्याचा अंदाज आहे.
तेलाच्या शोधासाठी ठिकठिकाणी पृथ्वीला जखमी केलं जातंय आणि यामुळे पृथ्वीच्या आतमध्ये खोलवर असणाऱ्या खडकांचं संतुलन बिघडतंय.
जेव्हा खोलवर ड्रिलिंग केलं जातं तेव्हा हे थर उद्ध्वस्त होतात आणि त्यांच्यातली ऊर्जा मोकळी होते. यामुळे भूकंप होतो.