मधाचे  आरोग्यदायी  फायदे

मध हा एक असा स्वादिष्ट पदार्थ आहे, ज्याचा आपण डाएटमध्ये सहजरित्या समावेश करू शकतो.

आयुर्वेदामध्ये मधाला संपूर्ण आहाराचा दर्जा देण्यात आला आहे.

योग्य प्रमाणात मधाचे सेवन केल्यास आरोग्याला चमत्कारिक फायदे मिळतात.

मधामध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, खनिजे, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, झिंक, कॉपर, सेलेनिअम, जीवनसत्त्व इत्यादी पोषक तत्त्वांचाही समावेश असतो.

कित्येक आजारांवर औषध म्हणून आयुर्वेदिक उपचारांमध्ये मधाचा वापर केला जातो.

मधाचा वापर हा भारतासोबत जगभरामध्ये चेहर्‍याशी आणि त्वचेशी संबंधित समस्यांवर गुणकारी औषध म्हणूनदेखील केला जातो.

चेहर्‍यावरील काळे डाग किंवा एक्जिमा असल्यास कच्च्या मधाचा लेप लावल्याने फायदा होतो.

शरीरामध्ये होणार्‍या हिलिंग प्रक्रिया वेगाने होण्यासाठी मध मदत करते.