व्ही आर संबंधित ॲपल ने हल्लीच लॉन्च केलेल्या Apple Vision Pro या डिवाइस बद्दल खूप चर्चा होत आहे.
यामध्ये दोन्ही डोळ्यांसाठी 4K डिस्प्ले देण्यात आले आहेत. २३ मिलियन पिक्सल ची स्क्रीन देण्यात आली आहे.
सोबत यामध्ये १२ कॅमेरे देण्यात आले आहेत जे आपल्या हातांच्या हालचाली, आणि डोळे/नजर देखील ट्रॅक करतात.
वापरकर्ते चित्रपट पाहू शकतील, संगीत ऐकू शकतील, ब्राउझ करणे, थ्रीडी सादरीकरण पाहणे इ. अनेक कामे करु शकतात.
यामध्ये ॲपल मॅकबुक मध्ये मिळणारा प्रोसेसर
एम टू
सोबत अजून एक चिप सेट
आर वन
येतो.
हे futuristic डिवाइस AR आणि VR मदतीने विकसित केले गेले आहे. यामुळे लॅपटॉप मोबाईल न वापरता तीच कामे या डिवाइस च्या माध्यमातून आपण करू शकतो.
ॲपल कंपनीने यूएस मध्ये ३५०० डॉलर किमतीला लॉन्च केले आहे. भारतात अजूनही हे लॉन्च झालेले नाही.
भारतात लॉन्च झाल्यास
Apple Vision Pro
ची साधारण किंमत ही २.८० लाख ते ३.०० लाख रूपये असू शकते.
बाजारात आणलेल्या या
फ्युचरिस्टिक डिवाइस
मुळे तंत्रज्ञान क्षेत्रात अमुलाग्र बदल घडणार आहे.