Tata Curvv Dark Edition

Tata Curvv Dark Edition : टाटा मोटर्स भारतातील एक प्रमुख ऑटोमोबाईल कंपनी आहे, जी आपल्या अत्याधुनिक आणि सुरक्षित वाहनांसाठी प्रसिद्ध आहे. टाटा मोटर्सची अनेक वाहने भारतीय रस्त्यांवर धावतात. अलीकडे केलेल्या महत्त्वपूर्ण बदलांमुळे आणि आधुनिक डिझाईन थीम मुळे टाटा मोटर्स प्रसिद्धीस आली आहे. टाटा पंच, नेक्सॉन, टाटा अल्ट्रोझ, टाटा हॅरियर, टाटा सफारी यांची भारतीय बाजारात विक्रमी विक्री होताना दिसत आहे. यात प्रामुख्याने टाटा पंच, टाटा नेक्सॉन, नेक्सॉन ईव्ही यांनी सुझुकी मोटार ला देखील मागे टाकले आहे. अशातच आता टाटा कर्व्ह कुप एसयूव्ही ही नवीन डार्क एडिशनसह लवकरच बाजारात धुमाकूळ घालणार आहे.

Tata Curvv Dark Edition
Tata Curvv Dark Edition

हे नवीन डार्क एडिशन आकर्षक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह बरेच नवीन फीचर्स सह बाजारात लवकरच लॉन्च होणार आहे. टाटा मोटर भारतीय बाजारात आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी Tata Curvv Dark Edition भारतीय बाजारपेठेत लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या लेखात आपण टाटा कर्व्ह डार्क एडिशनच्या तपशीलांवर एक नजर टाकू, ज्यात इंजिन, वैशिष्ट्ये, किंमत, व्हरिएंट्स आणि इलेक्ट्रिक व्हरिएंटची माहिती घेऊ.

Tata Curvv डार्क एडिशनची वैशिष्ट्ये

टाटा कर्व्ह डार्क एडिशन हे एक कुपे एसयुव्ही आहे जी आधुनिक डिझाइन आणि सुविधांसह येते. ह्या मॉडेल मध्ये डार्क फिनिश अलॉय व्हील्स, ब्लॅक ऑर्नामेंटेशन आणि अनोखे स्टायलिंग घटक टाटा मोटर्स ऑफर करू शकते, जे त्याला एक आकर्षक आणि भारदस्त रोड प्रेझेन्स प्रदान करते. डार्क एडिशनमध्ये टाटा मोटर्सच्या सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा समावेश आहे, ज्यामुळे ते केवळ दिसण्यातच नाही तर परफॉर्मन्स मध्येही उत्कृष्ट आहे.

हे देखील वाचा – TATA Avinya X

Tata Curvv Dark Edition इंजिन

टाटा कर्व्ह डार्क एडिशन दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध असेल:

  • पेट्रोल इंजिन :
  • १.२ लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन १२० बीएचपी पॉवर आणि १७० एन एम टॉर्च जनरेट करते, यामध्ये ५ स्पीड मॅन्युअल तसेच ६ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स ऑफर करण्यात आला आहे.
  • डिझेल इंजिन :
  • १.५ लीटर डिझेल इंजिन हे इंजिन ११८ बीएचपी पॉवर आणि २६० एन एम टॉर्क जनरेट करते. ६ स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स ऑफर करण्यात आला आहे.
  • १.२-लिटर टी-जीडीआय टर्बो-पेट्रोल इंजिन : १२३ बीएचपी पॉवर आणि २२५ एन एम टॉर्च जनरेट करते.

तिन्ही इंजिन पर्याय इंधन कार्यक्षम आणि परफॉर्मन्सच्या दृष्टिकोनातून उत्तम आहेत. पेट्रोल इंजिन स्पोर्टी ड्रायव्हिंगसाठी योग्य आहे, तर डिझेल इंजिन लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी चांगले आहे.

Tata Curvv Dark Edition फिचर्स

टाटा कर्व्ह डार्क एडिशनमध्ये अनेक प्रीमियम सुविधा आहेत, ज्यामुळे डार्क एडिशन इतर मॉडेल्सपेक्षा वेगळे ठरते. काही प्रमुख सुविधा आहेत:

  • टाटा कर्व्हच्या या व्हेरिएंट मध्ये देखील ६ एअरबॅग्स,अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, हिल असिस्ट कंट्रोल, कंफर्ट आणि कनेक्टिव्हिटी, ७ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार प्ले सपोर्ट, वायरलेस चार्जिंग, डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, प्रीमियम साउंड सिस्टम, LED हेडलॅम्प्स आणि डे-टाइम रनिंग लाइट्स, १६ इंच डार्क अलॉय व्हील्स, रूफ रेल, सनरूफ इत्यादी फिचर्स ऑफर करण्यात आले आहेत.

TATA Curvv launch

टाटा कर्व्ह डार्क एडिशन अनेक व्हरिएंट्समध्ये उपलब्ध असेल, ज्यामुळे ग्राहकांना त्यांची आवड आणि बजेटनुसार निवड करण्यास सोयीचे होईल. Tata Curvv Dark Edition ची अंदाजे किंमत १० -१५ लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असेल. यामध्ये बेस मॉडेल, मिड-रेंज आणि फुल्ली-लोडेड टॉप मॉडेल व्हेरिएंट उपलब्ध असतील.

Tata Curvv ev

टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक Tata Curvv ev मध्ये देखील डार्क एडिशन लॉन्च करण्याची तयारी केली आहे.

टाटा कर्व्ह डार्क एडिशन हे एक आकर्षक आणि सुसज्ज कुपे एसयुव्ही आहे. जी ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ती करण्यास सक्षम आहे. कर्व्ह चे आकर्षक डिझाइन, शक्तिशाली इंजिन पर्याय, प्रीमियम सुविधा आणि स्पर्धात्मक किंमतीमुळे ते भारतीय ऑटोमोबाईल बाजारात Tata Curvv आपले स्थान नक्कीच पक्के करेल.

जर तुम्ही एक आधुनिक, स्टायलिश आणि सुसज्ज एसयुव्ही शोधत असाल, तर टाटा कर्व्ह डार्क एडिशन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो, लवकरच येणाऱ्या या मॉडेलसाठी तयार रहा.

हे देखील वाचा – TATA Motors | ऑटो अपडेट

tata curvv ev | tata curvv ev price | tata curvv petrol | tata curvv diesel | tata curvv launch date | tata curvv cng price | tata curvv ev launch date | tata curvv launch date and price | tata curvv brochure | tata curve booking | tata curve ev booking | tata curvv width | tata CURVV car |

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

o
Scroll to Top