Marathi Kavita Nashib : आपल्या मराठीत म्हण आहे “हात धूवून पहिला, पण नशिब धूवून पाहता येत नाही”. नशिब हा तसा पाहता तीन अक्षरी शब्द पण माननार्यांसाठी या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. प्रत्येक जण इथे रात्रंदिवस काम करतो, मेहनत करतो एवढं करून त्याला यश मिळालं की लोक म्हणतात तो नशीबवान आहे, यश नाही मिळालं की लोक म्हणतात त्याच नशिबच खराब आहे. पण माझी नशिबा बद्दल व्याख्या वेगळी आहे. ती मी या कवितेतून मांडत आहे. कवितेचे नाव आहे नशिब …
Marathi Kavita Nashib

Marathi Kavita Nashib नशिब
नशिबाला कुणी हसू नये
किंबहुना नशिबाच्या कुणाच्या हसू नये
नशिब कुणाला विकत घेता येत नाही
वेळेचे नेहमी भान ठेवावे
कारण वाईट वेळ सांगून येत नाही.
बुद्धी कितीही तल्लख असली
तरी नशिबाशिवाय जिंकता येत नाही
बिरबल बुद्धिमान असला तरी ही
राजा कधीच तो बनू शकला नाही.
नशिबाने माणसं श्रीमंत होतात
त्या श्रीमंतीवर माज करायचा नाही
कारण इतिहास साक्षीदार आहे
राजाचा रंक बनायला वेळ लागत नाही.
नशिबाने मिळतात खरी नाती
ती नाती जपायला शिका
एकदा का ती नाती तोडली
तर पुन्हा ती नाती एकत्र आणण
नशिबाला सुद्धा जमणार नाही.
कवि :- मनिष महादेव जोशी
हे देखील वाचा – प्रेमाच्या कविता
मराठी कविता | Marathi Kavita | Marathi Kavita Nashib : Manish Joshi | नशीब | Marathi poem |