Thalipith Recipe थाळीपीठ

Thalipith Recipe : मित्रांनो कोकणातील खाद्य संस्कृती ही जगभर प्रसिद्ध आहे. येथे बनणारे पदार्थ एकदा खाल्ले की त्याची चव आयुष्यभर विसरता येत नाही, असाच काहीसा एक पदार्थ जो संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे‌. तो म्हणजे थालीपीठ…

थालीपीठाचे अनेक प्रकार आपणास महाराष्ट्रात पाहायला मिळतात, यामध्ये प्रामुख्याने तांदळाचे थालीपीठ, शिंगाड्याच्या पिठाचे थालीपीठ, साबुदाण्याचे थालीपीठ, गव्हाचे थालीपीठ इ. वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांचे पीठ एकत्र करून देखील थाळीपीठ बनवता येते. थालीपीठ हा एक पौष्टिक असा प्रथिनांनी परिपूर्ण पदार्थ आहे. चला तर मग पाहूया Thalipith रेसिपी.

Thalipith Recipe थाळीपीठ

👤४ जणांसाठी 🕑 १५ -२० मिनिटे

Thalipith Recipe साहित्य

Thalipith Recipe

तांदळाचे पीठ : १/४ कप

बाजरीचे पीठ : १/४ कप

चण्याचे पीठ : १/४ कप

ज्वारीचे पीठ : १ कप

२ चिरलेल्या हिरव्या मिरच्या

१ बारीक चिरलेला कांदा

चवीनुसार मीठ

कोथिंबीर स्वादासाठी

आले लसूण पेस्ट

हळद १/४ टेबल स्पून

जिरे/ जिरे पावडर १/२ टेबल स्पून

तीळ २ टेबल स्पून (उपलब्ध असल्यास)

तेल

हिंग चिमूटभर (उपलब्ध असल्यास)

धने पावडर १/२ टेबल स्पून

Thalipith Recipe कृती

  • सर्वप्रथम एका बाऊलमध्ये ज्वारी, बाजरी, तांदूळ, बेसन पीठ चांगले एकजीव करून घ्या.
  • या पिठामध्ये आता आले लसूण पेस्ट, जिरेपूड, हळद, धना पावडर, मीठ, हिंग, तीळ घालून मिक्स करून घ्या.
  • पिठामध्ये आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालून पीठ चांगले मळून घ्या.
  • थालीपीठ बनवण्यासाठी तुम्ही पारंपरिक पद्धतीने म्हणजे ओले कापड देखील देखील थालपीठ बनवू शकता.
  • थालीपीठ बनवताना शक्यतो पातळ आणि गोलाकार बनवा, थाळी पीठ हाताने बनवल्यास त्यात छिद्रे करा.
  • आता पण अथवा तवा मध्यम आचेवर गरम करून घ्या तेव्हा गरम झाल्यानंतर यावर तेल टाकून तव्यावर पसरवून घ्या.
  • बनवलेले थाळी पीठ दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्या. छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या व एका प्लेटमध्ये काढून घ्या.
  • थालीपीठ तयार झाल्यानंतर हे चटणी सोबत सर्व्ह करा अथवा दही देखील घेऊ शकता.

थालीपीठ हे अतिशय चवदार असून आरोग्यासाठी पौष्टिक देखील आहे, त्यामुळे थालीपीठ रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा.

हे देखील वाचा डांगर रेसिपी, पनीर ठेचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

o
Scroll to Top