Makar Sankranti 2025 wishes in Marathi | Makar Sankranti Shubhechha | Makar Sankrant | Marathi Shubhechha
Makar Sankranti 2025 wishes in Marathi : मकर संक्रांति अगदी लहानपणापासून थोरांपर्यंत सगळेच अगदी उत्साहात साजरी करतात. सूर्याचे मकर राशि मध्ये परिवर्तन होते या दिवसाला मकर संक्रांति म्हणून ओळखले जाते. याला सूर्याचे उत्तरायण असे देखील म्हटले जाते. या सणाला घरातील सगळे लोक एकत्र येऊन पारंपारिक रित्या हळदीकुंकू, तिळगुळ वाटणे, पतंग उडवणे, तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे बोलत नातेवाईक शेजारी यांची भेट घेणे इत्यादी पारंपारिक गोष्टी या या दिवशी केल्या जातात.
Makar Sankrant या सणाला वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे नावे आहेत जसे पंजाब मध्ये माघी, आसाम मध्ये माघ बिहू, जम्मू मध्ये माघी संग्रांद/ नारायण, हरियाणा मध्ये सक्रत, हिमाचल प्रदेशात साजी, राजस्थानमध्ये सकरत असे वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. या सणाला आपल्या प्रियजनांना खास शुभेच्छा देऊन नात्यातील गोडवा अधिक वाढवा.

Makar Sankranti 2025 wishes in Marathi
मराठ मोळा सण आपुला, आज कुणाशी भांडू नका,
रुसवे फुगवे विसरून सारे, मनातील द्वेष काढून टाका.
उंच भरारी घेतो पतंग, त्याच्या संगे आनंदाने डोला,
अहो मकर संक्रांतीचा सण आपला
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.
आपणास आणि आपल्या परिवारास
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
❇️✳️✳️
उत्तराणायणातील पहिल्या महिन्यातील पहिला सण,
आपल्या आयुष्यात आनंद, सुख, समाधान, समृद्धी घेऊन येवो.
आपणास आणि आपल्या परिवारास
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
❇️✳️✳️
Makar Sankranti Shubhechha | Makar Sankranti 2025 wishes in Marathi | Makar Sankranti Shubhechha | Makar Sankrant | Marathi Shubhechha
❇️✳️✳️
रांगोळीने सजले आंगण
आनंदाला उधाण भरले
तोच संक्रांतिचा सण समजावा
ज्यात प्रेमाचे नाते जडले…आनंदाला आली बहर
पतंग बाजीने केली कहर
चढा ओढ प्रत्येकाची येते
जणू पतंग आकाशी नाचे
आपणास आणि आपल्या परिवारास
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
❇️✳️✳️
थंडी वाजते कडकडा
तिलगुळाने भरला घडा….
आनंदाच्या या समई
तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला…! मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा…
❇️✳️✳️
तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला
सर्व मतभेद विसरून आता
सजवू आनंदाचा डोलारा…उत्तरायाणा तील पहिला सण आला
आनंदाला महापूर आला,
बंधू भगिनी सांगे ज्याला त्याला,
अहो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.
❇️✳️✳️
तीळ आणि गुळा प्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात गोडवा पसरवूया.
एक मेकांतील मतभेद विसरून
मकर संक्रांती साजरी करूया.
❇️✳️✳️
हे देखील वाचा – कोकण कल्चर

❇️✳️✳️
मकरसंक्रांत म्हणजे सर्व दुःख दूर करून,
एक मेकांना तिळगुळ देऊन
आनंद साजरा करण्याचा दिवस.
चला सर्व दुःख विसरून आता आपण आनंदाचे गीत गाऊया,
तिळगुळ आणि पतंगाच्या संगे जल्लोषात सण साजरा करूया.
आपणास आणि आपल्या परिवारास
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
❇️✳️✳️
कण भर तीळात मण भर प्रेम,
मण भर प्रेमात गोडव्याचा खेळ,
आनंदाच्या क्षणात आपण आता रंगूया,
तिळगुळा च्या संगे संक्रांती साजरी करूया!
संक्रांतीच्या शुभेच्छा!
❇️✳️✳️
मायेच्या हळव्या हाताने तिळाचे लाडू वळायचे,
हलव्याच्या चार दाण्याने त्यात एकरूप व्हायचे.
तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे सर्वांनाच सांगायचे,
पहिल्या महिन्याच्या पहिल्या सणाला तिळगुळाने गोड करायचे!
संक्रांतीच्या शुभेच्छा!
❇️✳️✳️
मराठमोळे सण आता दिमाखात साजरे करायचे,
तिळगुळाच्या गोडव्याने सर्वांना आपले करायचे.
संक्रांतीच्या शुभेच्छा!
❇️✳️✳️
मराठी आमची अस्मिता, मराठी आमची शान…..
मकर संक्रांतीच्या सणाचा आम्हाला अभिमान!
संक्रांतीच्या शुभेच्छा!
❇️✳️✳️
आपले नाते शेवटी आपणच जपायचे
संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ नक्की वाटायचे!
संक्रांतीच्या शुभेच्छा !
❇️✳️✳️
तुमच्या स्वप्नांना पतंग प्रमाणे उंच भरारी घेऊ दे… शांत समाधान आनंद तुम्हास लाभू दे मकर संक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा…!
❇️✳️✳️
म – मराठमोळा सण
क – कणखर बाणा
र – रंगीबेरंगी तिळगुळ
सं – संगीतमय मैफिल
क्रा – क्रांतीची मशाल
त- तळपणारे तेज
मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा….
❇️✳️✳️
हे देखील वाचा – पनीर आणि ठेचा यांची आगळीवेगळी रेसिपी | कोकण सुंदरी महाअंतिम फेरी २०२५
❇️✳️✳️